ISRO रचणार नवा इतिहास, 30 जुलैला 7 Satellite लॉन्च करणार

टाइम्स मराठी। चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ISRO आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. इस्रो 30 जुलै 2023 ला PSLV C56 या रॉकेटच्या माध्यमातून पॅड वन वरून एकाच वेळी सात सॅटॅलाइट लॉन्च करणार आहे. यासाठी सकाळी 6.30 वाजताची वेळ निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे एक कमर्शियल लॉंचिंग असून यामध्ये सर्वात जास्त सॅटॅलाइट सिंगापूर येथील आहे.

   

सिंगापूर येथील डीएसटीए अँड इंजीनियरिंग या ठिकाणावरून मेन सॅटॅलाइट DS-SAR पाठवण्यात आले आहे. हे सॅटेलाईट तैनात करण्यात आल्यानंतर आणि काम सुरू झाल्यानंतर सरकारला सिंगापूर नकाशे तयार करण्यासाठी मदत करणार आहे. जेणेकरून सॅटेलाईट द्वारे फोटोज घेणे सोपे होईल. यासोबतच जियोस्पेशियल सर्विसेस आणि कमर्शियल डिलिंग सुद्धा होऊ शकेल. DS-SAR मध्ये सिंथेटिक अपर्चर रडार पेलोड आहे. हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज ने बनवलेले असून हा सॅटेलाईट कोणत्याही वातावरणामध्ये हवामानातील छायाचित्रे घेऊ शकेल. या सॅटॅलाइट चे वजन 360 kg असून ते PSLV C-56 रॉकेटच्या माध्यमातून अंतराळाच्या जवळ इक्वेटोरियल ऑर्बिट NEO मध्ये सोडण्यात येणार आहे. यासोबतच आणखीन सहा छोटे नॅनोसॅटेलाईट देखील जाणार आहेत.

या सहा सॅटेलाइट्स पैकी एक म्हणजे VELOX AM. हे सॅटेलाईट 23 किलो ग्रॅम एवढे असून हे टेक्नॉलॉजी डिमॉन्स्टेटर मायक्रो सॅटेलाईट आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचे सॅटेलाईट ARCADE. हे एक प्रायोगिक सॅटेलाईट असून याचं पूर्ण नाव ऍटमॉस्फीअरीक कपलिंग अँड डायनेमिक एक्सप्लोरर आहे. तिसरं सॅटेलाईट SCOOB -2. हे सॅटेलाईट एक 3U नॅनो म्हणजेच छोटे सॅटॅलाइट आहे. हे सॅटॅलाइट डिमॉन्स्ट्रेशन च्या टेस्टिंग साठी पाठवण्यात येत आहे. यानंतर चौथे सॅटेलाईट NuLIoN. हे देखील 3U नॅनो म्हणजेच छोटे सॅटॅलाइट आहे. या सॅटेलाईटच्या माध्यमातून शहर आणि दुर्गम भागामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स सुविधा प्रदान करते. पाचवं सॅटॅलाइट Galassia 2 हे देखील नॅनो सॅटेलाईट असून याला पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. सहाव्या नंबरचं सॅटेलाईट हे ORB 12 STRIDER. हे सॅटेलाईट आंतरराष्ट्रीय कोलेबोरेशन यांच्या माध्यमातून सिंगापूर येथील एलीएना पिटीइ लिमिटेड कंपनीने बनवले आहे.