ISRO आणि NASA एकत्र करत आहे ‘या’ प्रोजेक्टवर काम; दर 12 दिवसांनी मिळेल पृथ्वीवरील ‘ही’ माहिती

टाइम्स मराठी । Isro या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम  यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या होत्या. चांद्रयान 3 नंतर इस्रोने सूर्ययान म्हणजेच आदित्य L1, त्यानंतर गगनयान हे मिशन यशस्वी साध्य करण्याचे प्रयत्न केले. चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य L1 मिशन देखील यशस्वीरित्या पार पडले. आता गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात आली असून हे मिशन देखील यशस्वी होईल. त्यानंतर आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच NASA आणि भारताची ISRO हे एकत्र येऊन एका प्रोजेक्टवर काम करत आहे.

   

ISRO आणि NASA या संस्था नासा- इस्त्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच निसार या प्रोजेक्टवर काम करणार आहे. या प्रोजेक्टचे प्रक्षेपण पुढच्या वर्षी म्हणजे 2024 ला 3 महिन्यांच्या आत होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत नासाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, कंपन्या संदर्भात काही चाचण्या केल्यानंतरच नासा – इस्त्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच निसार प्रक्षेपित करण्यात येईल असं देखील ते म्हणाले. 

काय आहे उद्देश

निसार (NISAR) च्या माध्यमातून पृथ्वीवरील वनक्षेत्र, वेट लँड इको सिस्टीम, त्याचा होणारा प्रभाव या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. निसार च्या माध्यमातून ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणाचा अभ्यास करणे अत्यंत सोपे होईल. पृथ्वीवर असलेली झाडे, नदी,खारफुटी जमिनींच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती नासा आणि इस्त्रोला मिळवून देईल. या सोबतच तापमान वाढीला जबाबदार असलेले घटक ग्रीन हाऊस गॅसेस यांच्या नैसर्गिक रेग्युलेशन मधील महत्त्वाची माहिती देखील मिळेल.

दर 12 दिवसांनी मिळेल जमीन, बर्फाळ प्रदेशांची माहिती

निसार प्रक्षेपित केल्यानंतर आणि निसारने कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये उपलब्ध असलेली प्रगत रडार सिस्टीम 12 दिवसांनी पृथ्वीवरील सर्व जमीन आणि बर्फाळ प्रदेशांचे व्यापक स्कॅनिंग करेल. आणि हा संपूर्ण डेटा पर्यावरण अभ्यासकांसाठी फायद्याचा ठरू शकेल. यासोबतच कार्बन उत्सर्जन आणि शोषणा बद्दलची माहिती देखील मिळवण्यात येईल. नासा आणि इस्रोने मिळून ऑब्झर्वेशन मिशन च्या माध्यमातून हार्डवेअरच्या विकासात  मदत करणाऱ्या दोन संस्था मधील सहकार्याने हा निसार प्रकल्प तयार केला आहे.

मोहिमेचा कालावधी पूर्णपणे तीन वर्षांचा

जमिनीत होणारे बदल, कार्बन चक्र, या कार्बन चक्राचा प्रभाव या सर्व गोष्टींचा जागतिक पातळीवर अभ्यास करणे  निसार NISAR च्या माध्यमातून सोपे होईल. कार्बन चक्र हे वातावरण, जमीन, समुद्र आणि सजीवांमधील कार्बन गती नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. या निसार मोहिमेचा कालावधी पूर्णपणे 3 वर्षांचा आहे. 3 वर्ष या मोहिमेच्या माध्यमातून दर 12 दिवसांनी पृथ्वी जमीन बर्फ अच्छादित पृष्ठभागाची माहिती मिळेल.

काय म्हटले निसार चे व्यवस्थापक

निसार या प्रोजेक्टचे व्यवस्थापक फिल बरेला यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, पुढच्या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यात नासा आणि इस्रो ने तयार केलेल्या निसार प्रोजेक्ट चे प्रक्षेपण करण्यात येईल. प्रक्षेपणासाठी निसार पूर्णपणे तयार असून जानेवारी 2024 पूर्वी या निसारचे प्रक्षेपण होण्याची अपेक्षा नाही. निसार हे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून मार्क यान 2 च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.