ISRO Mission To Venus : चांद्रयान 3 आणि आदित्य- L1 नंतर ISRO चा मोर्चा शुक्र ग्रहाकडे; लवकरच लाँच करणार मिशन

टाइम्स मराठी । चांद्रयान आणि आदित्य एल वन नंतर आता ISRO आपला मोर्चा शुक्र ग्रहाकडे (ISRO Mission To Venus) वळवला आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये ISRO आपलं मिशन व्हीनस लाँच करण्याची शक्यता आहे. शुक्रयान या मिशन च्या माध्यमातून व्हीनस ऑर्बिटर शुक्रावर पाठवण्यात येणार आहे. या मिशनपूर्वी सध्या इस्त्रोकडून  Xposat किंवा X-Ray polarimeter सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे. या प्रक्षेपणाचा उद्देश उज्वल एक्स-रे पल्सरचा अभ्यास करणे असा आहे. शुक्रयान हे शुक्र ग्रहाच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा अभ्यास करेल. त्याचबरोबर शुक्राचा पृष्ठभाग, वातावरणाचे रसायन, त्यांची संरचना, सौर वादळ, शुक्रावर होणारे वातावरणीय बदल या सर्वांचा अभ्यास शुक्रयानाच्या मार्फत करण्यात येईल.

   

पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रक्षेपित होईल शुक्रयान– ISRO Mission To Venus

सूर्यमालेतील सर्वात चमकदार ग्रह शुक्र या ग्रहाच्या मिशनवर काम आताच नाही तर 2017 पासून सुरू आहे. शुक्रयान ही संकल्पना 2012 मध्येच आली होती. त्यानंतर 2017 मध्ये या मिशनसाठी निधी मिळाला. आणि 2017 ला हे काम सुरू झालं. परंतु कोरोना महामारीमुळे चांद्रयान, गगनयाना सोबत शुक्रयान ही मोहीम देखील पुढे ढकलण्यात आली. आता पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये  शुक्रयान प्रक्षेपित करण्यात येईल. (ISRO Mission To Venus)

डिसेंबर मध्ये पृथ्वी आणि शुक्र असतील सरळ रेषेत

पृथ्वीच्या जवळ असलेल्या ग्रहांपैकी शुक्र हा एक ग्रह आहे. यासोबतच पृथ्वीच्या जवळ सूर्य असल्याचे देखील म्हणतात. त्यानुसार हा शेजारी असलेला ग्रह पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून देखील ओळखला जातो. 2024 डिसेंबर मध्ये  पृथ्वी आणि शुक्र हे सरळ रेषेमध्ये असतील. त्यानुसार अंतराळयान  शुक्र ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश करून अभ्यास करू शकतात. 2024 डिसेंबर नंतर ही संधी 2031 मध्ये मिळू शकते. पृथ्वी आणि शुक्र सरळ रेषेमध्ये असल्यामुळे शुक्रयान यशस्वी होऊ शकते.

X-Ray Polarimeter वर काय म्हणाले एस सोमनाथ

एक्स-रे पोलारी मीटर सॅटेलाईट वर एस सोमनाथ यांनी सांगितलं की, आम्ही एक्सोवर्ल्ड्स नावाच्या सॅटेलाईटचा विचार करत आहोत. आपल्या सूर्यमालेमध्ये असलेले आणि दुसऱ्या सूर्यमालेतील ग्रह तारे पाहण्यासाठी हे मिशन आहे. या एक्सो ग्रहांपैकी कमीत कमी 100 ग्रहांवर राहण्यायोग्य वातावरण उपलब्ध आहे. या मिशनच्या माध्यमातून एक्सो ग्रहावर असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल.