ISRO Space Station । चांद्रयान तीनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर भारताने मानाचा तुरा उंचावला आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सात अंतराळ मिशन बद्दल सांगितले होते. त्यापैकी एक म्हणजे आदित्य एल वन हे मिशन लॉन्च करण्यात आले आहे. यानंतर इस्रोचे गगन यान हे मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. गगन या मिशनच्या माध्यमातून मानवाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आता इस्रोचा आणखीन एक मिशन सादर होणार आहे. हे मिशन म्हणजे स्पेस स्टेशन. म्हणजेच इस्रो कडून आता अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवण्याची तयारी सुरु आहे.
गगनयान हे मिशन 2030 पर्यंत लॉन्च करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर इस्रो अंतराळात स्पेस स्टेशन लॉन्च करण्याची तयारी करणार आहे. असं झाल्यास इंटरनेशनल स्पेस स्टेशन आणि चीनच्या तियागोंग स्पेस स्टेशन नंतर भारताचे हे जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनेल. आणि हे मोठ्या प्रमाणात ISS आणि चीनच्या स्पेस स्टेशन पेक्षा खास असेल. सध्या तरी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे स्पेस स्टेशन काम करत आहे. अमेरिका आणि रशियाने 1998 मध्ये एक संयुक्त प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बांधले होते. त्यानंतर यामध्ये जपान कॅनडा युरोपियन स्पेस एजन्सी सहभागी झाले होते. परंतु या स्टेशनचा संपूर्ण खर्च अमेरिका उचलते.
2030 पर्यंत तयार करण्यात येईल स्पेस स्टेशन– ISRO Space Station
चीनने तयार केलेल्या स्पेस स्टेशनचे वजन हे 88 टन एवढे आहे. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे वजन 450 टन एवढे आहे. भारत बनवणाऱ्या स्पेस स्टेशनचे वजन हे 20 टन एवढे असेल. इस्रो हे स्पेस स्टेशन अशा पद्धतीने तयार आहे की , यामध्ये चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील. हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या लोवर ऑर्बिट मध्ये स्थापित करण्यात येणार आहे. त्यापासून LEO हे 400 किलोमीटर दूर आहे. याच LEO मध्ये चारशे किलोमीटर अंतरावर गगन यान पाठवण्यात येणार आहे. आणि ज्या ठिकाणी गगन यान मिशन पोहोचेल त्याच ठिकाणी भारताने स्पेस स्टेशन बनवण्याची प्लानिंग केली आहे. 2019 मध्ये इस्रोच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली होती. आता गगनयान मिशन नंतर 2030 पर्यंत हे स्पेस स्टेशन तयार होईल. त्याचबरोबर भारत सरकारकडून स्पेस डोकिंग यासारखे टेक्नॉलॉजी वर रिसर्च करण्यासाठी बजेट देण्यात येणार आहे. ज्यामुळे स्पेन स्टेशन बनवण्यासाठी आणखीन बळ मिळेल.
अमेरिका देणार अंतराळवीरांना प्रशिक्षण
भारताचे स्पेस स्टेशन (ISRO Space Station) बनवून तयार होईल तोपर्यंत अमेरिकेकडून भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी नासा आणि इस्रो या दोघांमध्ये पार्टनरशिप करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 2024 मध्ये भारतातील २ अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्येही पाठवण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांना अमेरिकाच्या ह्युस्टन या ठिकाणी असलेल्या जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये ट्रेनिंग दिले जाईल.
स्पेस स्टेशन म्हणजे काय?
स्पेस स्टेशन (ISRO Space Station) हे एक अंतराळातील ठिकाण आहे. ज्या ठिकाणी शास्त्रज्ञ राहतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन देखील करतात. हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरत असते. एका अंतराळवीराला या ठिकाणी सहा महिने राहावे लागते. जेव्हा दुसरी टीम या ठिकाणी पाठवण्यात येते तेव्हाच पहिली टीम परत पाठवली जाते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर प्रत्येक वेळेस ७ अंतराळवीर पाठवले जातात. कधी कधी त्यांची संख्या देखील वाढत असते.