चांद्रयान 3 नंतर ISRO राबवणार आणखी 7 मोहिमा; मानवाला सुद्धा अंतराळात पाठवणार

टाइम्स मराठी । चांद्रयान तीन (Chandrayaan 3) ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच आणखीन काही अंतराळ मोहीम इस्रो कडून (ISRO) राबवण्यात येणार आहेत. इस्रो कडून बऱ्याच वर्षांपासून मानव युक्त मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे. आता ही पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली असून 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये ही मोहीम राबवण्यात येईल.

   

शुक्रवारी पीटीआय सोबत बोलत असताना इस्रोचे शास्त्रज्ञ एन रघु सिंग यांनी सात मोहीमांबाबत माहिती दिली. त्यापैकी एक मोहीम ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा सोबत करण्यात येणार आहे. यासोबतच इस्रोच्या गगनयान अंतर्गत तीन मोहिमांसोबतच बाकीच्या सहा मोहिमा राबवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला दोन मिशनमध्ये अंतराळवीर नसतील. तिसऱ्या मोहिमेमध्ये मात्र तीन अंतराळवीर असणार आहेत. मार्च 2024 पूर्वी ही मोहीम संपन्न केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

या मानवयुक्त मोहिमेमध्ये तीन दिवसांसाठी या तिन्ही अंतराळवीरांना तळातील अंतराळात पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरून सलग तीन दिवस गगनयान प्रदक्षिणा घालतील. त्यानंतर कृ मॉडेल यानापासून वेगळे करून पृथ्वीवर उतरवण्यात येतील. परंतु जेव्हा पहिल्या दोन मिशन यशस्वी होतील तेव्हाच या मानवयुक्त मोहिमा करता येऊ शकतात.

आतापर्यंत रशिया अमेरिका, चीन या तीन देशांना अंतराळात मानव युक्त मिशन राबवण्यासाठी यश मिळाले आहे. गगनयानाच्या मानव युक्त मोहिमेनंतर भारताचा देखील या यादीमध्ये समावेश होईल. यासोबतच भारत पुढच्या वर्षी चंद्रयान मोहीम ल्यूपेक्स लॉन्च करणार आहे. हा भारत आणि जपान चा संयुक्त उपक्रम असून पाण्याचे विश्लेषण हे या मिशनचे उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर इस्रो सूर्य मंगळसूत्र या ग्रहावर देखील संशोधन करण्याची तयारी करत आहे.

आदित्य एल 1

या सात अंतराळ मोहिमांमध्ये सूर्यावर अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 ही इस्रोची पुढच्या टप्प्यातील मोहीम असेल. चंद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्त्रोकडून आदित्य एल 1 या मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सूर्याचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूर्याच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. आपल्या प्रमाणाची निर्मिती असंख्यतारांपासून बनलेली असून वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सौरमालेतील सूर्याचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. आम्ही जगभरातील अंतराळ संशोधन संस्था सूर्याजवळ जेवढ्या लांब जाता येईल तेवढा जाऊन अभ्यास करत आहेत.

मंगळयान 2

ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रस्थापित केलेली दुसरी आंतरग्रह मोहीम आहे. मंगळयान दोन या मिशनमध्ये हाय पर्स्पेक्ट्रल कॅमेरा आणि रडार ऑर्बीटल प्रॉबमध्ये लावण्यात येईल. मंगळयान 1 या मिशनवेळी भारताला 450 कोटी रुपये खर्च आला होता. एवढ्या कमी खर्चातील ही जगातील पहिली मंगळ मोहीम ठरली होती.

शुक्रयान

मंगळ यान मिशन सक्सेसफुल झाल्यानंतर इस्रो कडून शुक्र ग्रहावर यान पाठवण्याची तयारी करण्यात येईल. आतापर्यंत अमेरिका युरोपियन अंतराळ संस्था आणि चीन ने देखील यावर काम सुरू केले आहे. चांद्रयान तीन ची यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रयान प्रक्षेपित होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी हे यान पाठवण्यात येणार आहे. यानुसारच आता नासा आणि बरेच देश शुक्रावरच्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहेत. पृथ्वीच्या बाहेर असलेल्या जीवसृष्टीचा शोध घेणे हा अंतराळ मोहिमेचा मेन उद्देश आहे. हे शुक्रयान शुक्र ग्रहाच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा अभ्यास करेल. त्याचबरोबर शुक्राचा पृष्ठभाग, वातावरणाचे रसायन, त्यांची संरचना, सौर वादळ, शुक्रावर होणारे वातावरणीय बदल या सर्वांचा अभ्यास शुक्रियानाच्या मार्फत करण्यात येईल.

हे शुक्रयान मिशन केव्हा लॉन्च करण्यात येईल हे अजूनही सांगण्यात आलेले नाही. परंतु इस्रोच्या मते शुक्र यान मोहीम 2031 पर्यंत पुढे सरकू शकते. यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. यानाच्या लॉन्चिंग साठीची योग्य वेळ दर 19 महिन्यांनी येते. यानुसार इस्रोकडे शुक्र यानाच्या लॉन्चिंगसाठी 2026 ते 2028 पर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे.

स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंट

जर भारताने भविष्यामध्ये अंतराळ स्थानक बनवले तर त्यासाठी स्पेस डॉग ची गरज भासू शकते. यासाठी स्पेस डॉकिंग देखील तयार करण्यात येत आहे.

एक्सपोसॅट

जगातील दुसरी किरण शोध मोहीम देखील भारत राबवणार आहे. एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह म्हणजे एक्सपोसॅट हे मिशन तेजस्वी खगोलीय क्ष किरण स्रोतांच्या आणि गतीचा अभ्यास करणारी जगातील दुसरी ध्रुवीय मोहीम आहे. ही मोहीम इस्रो राबवणार आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात येणार असून प्राथमिक पेलोड खगोलीय उत्पत्तीच्या 8-30 केई व्ही प्रोटॉनच्या मध्यम एक्स-रे ऊर्जा श्रेणीचे मापन करेल.

3 अंतराळवीरांना देण्यात येत आहे रशियात प्रशिक्षण

मानव युक्त अंतराळ मोहीमची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. यासाठी तिन्ही अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षित करण्यात आले असून कृ मॉड्युलही सज्ज करण्यात आले आहे. हे प्रक्षेपण एल एम व्ही 3 या महाबली रॉकेट च्या माध्यमातून केले जाणार असून भारत हे मिशन करणार आहे.

निसार मोहीम

नासा सोबतच निसार मोहीम देखील राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीच्या बदलत चाललेल्या इकोसिस्टीम चा अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर भूजल प्रवाह, ज्वालामुखी, ग्लेशियर वितळणे यासारख्या गोष्टींचा देखील अभ्यास करण्यात येईल. या मिशन मुळे भूकंप होणार असलेल्या ठिकाणांची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर 1.5 अब्ज डॉलर खर्च असलेला हा जगातील सर्वात महागडा उपग्रह असून 2024 मध्ये त्याचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे.