चांद्रयाननंतर आता मिशन गगनयान; ISRO अंतराळात पाठवणार ‘व्योममित्र’ रोबोट

टाइम्स मराठी । चांद्रयान 3 मिशनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून चंद्रावर भारताचा झेंडा रोवला आहे. हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. याचबरोबर भारत आता भविष्यात बऱ्याच मोहिमा राबवणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॉफ्ट लँडिंगच्या यशा वेळी वक्तव्य केले होते. त्यानुसार आता इस्त्रो गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. गगनयानमध्ये इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. त्यापैकी दोन मोहिमेमध्ये मानव व्यतिरिक्त तर तिसऱ्या मोहिमेमध्ये मानवालाही आंतरिक्ष मध्ये पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यात तीन अंतरिक्ष यात्री पाठवण्यात येणार आहे.

   

रोबोट पाठवला जाईल अंतराळात

भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) लवकरच पहिले मानव मिशन गगनयान लाँन्च करणार आहे. या मानव मिशन गगन यान मध्ये पहिल्यांदा मानव पाठवण्यात येणार आहे. गगनयान मिशन च्या सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टिम (SMPS) चे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आले. गगन यान मिशनमध्ये तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार असून आता मानवा आधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल. म्हणजेच इस्रो कडून या मिशनची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीसाठी रोबोट अंतराळात पाठवण्यात येईल. हे गगनयान मिशन ISRO साठी सर्वात मोठे यश आहे.

फायनल मिशन अगोदर होईल ट्रायल मिशन

भारताच्या या मानवी अंतराळ मोहिमेला गगन यान नाव देण्यात आलेलं असून गगन यानाच्या फायनल मिशन आधी ट्रायल मिशन घेण्यात येईल. ही ट्रायल मिशन तीन चाचण्यांनी पूर्ण होईल. आणि या तीनही चाचण्या मानवरहित असणार आहेत. यासाठी पहिल्या ट्रायल मिशनचे लॉन्चिंग एक ते दीड महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मानव रहित यान पाठवण्यात येणार आहे. हे यान अंतराळात रिकव्हरी सिस्टीम आणि टीमची पडताळणी करेल. दुसऱ्या चाचणी मोहिमेमध्ये व्योम मित्र हा रोबोट अंतराळामध्ये पाठवला जाईल. आणि त्यानंतर त्यावर चाचणी केल्या जाईल. गगन यान या अंतराळ मिशन साठी इस्रो कडून रोबोट तयार करण्यात येत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्योम मित्र रोबोट अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहे.

व्योममित्र नावाचा महिला रोबोट

इस्रो ने व्योममित्र नावाचा महिला रोबोट तयार केलेला असून चाचणीसाठी आता अवकाशात पाठवण्यात येणार आहे. हा ह्यूमेनॉईड रोबोट असेल. अवकाशातून सर्व अहवाल इस्त्रोला या रोबोटच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. त्याचबरोबर मानवाच्या सुरक्षेबाबत सर्व माहिती इस्रोला देण्यात येईल. हा रोबोट अंतराळामध्ये पाठवण्याचा उद्देश हा मानवी शरीराच्या हालचालींना समजून घेणे हे आहे. या व्योम रोबोट ला जगातील बेस्ट स्पेस एक्सप्लोरर ह्युमेनॉईड रोबोटचा किताब देण्यात आलेला असून सध्या बंगरूळमध्ये हा रोबोट मानवाप्रमाणे काम करत आहे.

गगनयान साठी वैज्ञानिकांकडून प्रयत्न सुरू

तिसऱ्या चाचणीमध्ये रोबोट नाही तर मानव अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहे. आपल्या देशासाठी आणि इस्रो साठी खूप महत्त्वाचे मिशन असून पुढच्या वर्षी लॉन्च करण्यात येणार आहे. गगन या मिशनमध्ये भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या चारही बाजूंनी सात दिवसांपर्यंत भ्रमण करावे लागेल. सध्या गगन यान हे फक्त एक किंवा तीन दिवसांच्या पृथ्वी भ्रमंतीसाठी लॉन्च केलं जाणार असून मोठ्या प्रमाणावर याची तयारी सुरू आहे. इस्रो या गगन यान मिशन साठी मोठ्या प्रमाणात चाचण्या करत आहे. इस्रोचा मेन उद्देश हा पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत मानवयान पाठवायचा आहे. हे मिशन यशस्वी झाल्यानंतर अमेरिका रूस चीन यासारख्या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील नंबर लागेल. त्याचबरोबर आता चांद्रयान पाठवण्यात आलेलं असून चांद्रयानाने चौथ्या कक्षेत यशस्वीरित्या पदार्पण केल्यामुळे गगन यानाला देखील असंच यश मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गगन यानासाठी हे तीन अंतराळवीर पाठवण्यात येणार

गगनयान या मिशनमध्ये भारतीय हवाई दलातील सक्षम वैमानिकांना अंतराळवीर म्हणून पाठवण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डचा देखील समावेश आहे. यासाठी या वैमानिकांचा प्रशिक्षण सुरू असून गगन यानाच्या फायनल लॉन्चिंग पूर्वी बऱ्याच चाचण्या केल्या जाणार आहे. गगन यान हे भारताचं आतापर्यंतचा सर्वात महागडे मिशन असेल.