झोपलेल्या विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोवरला ISRO आज जागं करणार

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले. 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रमने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. आता चंद्रयान तीनच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रम लँडर (Vikram Lander) आणि रोवर प्रज्ञान (Pragyan Rover) सोबत आज ISRO संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. चंद्रावर काळ रात्र सुरू झाल्यामुळे 4 सप्टेंबरला चंद्रयान तीनच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान दोन्ही पूर्णपणे चार्ज करून स्लीप मोडमध्ये टाकण्यात आले होते. कारण चंद्रावर वातावरण पूर्णपणे थंड असल्यामुळे लेंडर आणि रोव्हर या काळात काम करण्यास सक्षम नव्हते. परंतु आज इस्रो कडून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

   

अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र SAC चे निर्देशक निलेश देसाई यांनी सांगितलं की, जर नशिबाने साथ दिली तर आज विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर सोबत संपर्क होऊ शकेल. गेल्या 20 दिवसांमध्ये विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोवरने मायनस 120 ते मायनस 200 डिग्री सेल्सिअस एवढे थंड वातावरण सहन केले आहे. आता पृथ्वीच्या वेळेनुसार 20 सप्टेंबर सायंकाळपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय सुरू झाला आहे. विक्रम आणि प्रज्ञानचे सोलर पॅनल त्यांची बॅटरी हळूहळू चार्ज करण्यासाठी सक्षम असतील असं त्यांनी सांगितलं.

ISRO साठी अंतराळात काम करणारे उपकरण या केंद्रात बनवले जातात. चंद्रयान तीन साठी कॅमेरा प्रणाली आणि अलर्ट नोटिफिकेशन देण्यासाठी जी सेंसर प्रणाली वापरण्यात आली आहे. ती अंतरिक्ष उपयोग केंद्र SAC ने डेव्हलप केलेली आहे. देसाई यांच्यानुसार 22 सप्टेंबर पासून प्रज्ञान आणि विक्रम रिवाइव्ह करण्याची इस्त्रोची योजना आहे.

भुवनेश्वर येथील पथानी सामंत तारामंडल येथील रिटायर वैज्ञानिक सुवेंद्र पटनायक यांनी सांगितलं की, लँडर आणि रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरून मिळवलेला बराच डाटा पृथ्वीवर इसरोला पाठवला होता. जर आज विक्रम आणि प्रज्ञान सोबत संपर्क होऊ शकला तर हे नशिबापेक्षा कमी राहणार नाही. कारण मायनस 250 डिग्री तापमानामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण सु व्यवस्थित राहणे अत्यंत मुश्कील आहे. सध्या प्रज्ञान रोवर आणि विक्रम लॅन्डर व्यवस्थित असतील की नाही, त्यांची सिच्युएशन काय असेल हे रिवाईव्ह केल्यानंतर समजेल. यासोबतच अशी आशा आहे की दोन्ही उपकरण व्यवस्थित काम करतील. प्रत्येकवेळ प्रमाणे यावेळी देखील आमचे नशीब आम्हाला साथ देईल अशी आशा आहे. असं देसाई यांनी सांगितलं.