Whatsapp चॅट Hide करणे होणार सोप्प; येत आहे नवीन फिचर 

टाइम्स मराठी । Whatsapp चे जगात लाखो करोडो युजर्स आहेत. यापूर्वी Whatsapp हे फक्त मेसेंजर होते. परंतु आता इन्स्टंट मेसेजिंग ॲप बनले आहे. यापूर्वी व्हाट्सअप च्या माध्यमातून चॅटिंग हा ऑप्शन उपलब्ध होता. परंतु आता Whatsapp च्या माध्यमातून पर्सनल, ऑफिशियल, पेमेंट, बिजनेस यासारखे बरेच कामे केले जातात. कारण Whatsapp मध्ये  META कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. या फीचर्समुळे व्हाट्सअप वापरणे मजेशीर झाले असून मेटा कडून आणखीन बरेच फीचर्स व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. आताही Whatsapp एक नवीन फीचर्स लाँच करणार आहे.

   

मिळालेल्या ऑनलाईन रिपोर्टनुसार, Whatsapp मध्ये लॉक करण्यात आलेल्या चॅटला अर्जंट ॲक्सेस करण्यासाठी कंपनी दोन नवीन शॉर्टकट उपलब्ध करणार आहे. सध्या या नवीन शॉर्टकट वर काम सुरू आहे. यासोबतच ॲप गायब होणाऱ्या ऑप्शन सोबतच नवीन टेक्स्ट स्टेटस फीचर वर देखील काम सुरू आहे. या फीचर्सबाबत WABETAINFO या वेबसाईटवरून माहिती मिळाली आहे.

प्रोफाइल डिटेल्स फीचर्स वाढवण्याची शक्यता

Whatsapp सध्या नवीन टेक्स्ट स्टेटस फीचर डेव्हलप करत आहे. यामध्ये ॲप गायब  होण्यासाठी ऑप्शन देखील देण्यात येतील. सध्या हे फीचर iOS बीटा टेस्टर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. व्हाट्सअप मध्ये प्रोफाइल डिटेल्स फीचर्स मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येऊ शकतात. जेणेकरून युजर्सला काही कालावधीनंतर लिंक केलेले डिटेल्स गायब होण्यासाठी टाइमर सेट करण्याची अनुमती देते.

मोमेंट्री अपडेट

मिळालेल्या माहितीनुसार  युजर्स आता एक फ्लीटिंग टेक्स्ट स्टेटस ठेवू शकतात. हे स्टेटस काही काळानंतर ऑटोमॅटिकली गायब होईल. हे फीचर पर्सनल इन्फॉर्मेशन विजिबिलिटी वर वाढलेला कंट्रोल प्रायव्हसीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देईल. अशावेळी युजर्स प्रोफाईलवर परमनंट टेक्स्ट स्टेटस कंटिन्यू न ठेवता मोमेंट्री अपडेट शेअर करू शकतात.

चॅट हाईड फीचर

मीडिया रिपोर्टनुसार, व्हाट्सअप मध्ये लॉक करण्यात आलेलं चॅट हाईड करण्यासाठी देखील कंपनीकडून काम सुरू आहे. सध्या लॉक करण्यात आलेलं चॅट ही चॅट लिस्टमध्येच दिसते. ज्यामुळे लॉक करण्यात आलेल्या चॅट ची माहिती सहजरीत्या मिळू शकते. यामुळे व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करण्यात येणारे अपकमिंग फीचर युजर्सला एक्सेस पॉईंटला लपवण्यामध्ये मदत करेल. जेणेकरून लॉक करण्यात आलेली चॅट ओपन करण्यासाठी सर्च बार मध्ये एक सीक्रेट कोड एंटर करावा लागेल. हे नवीन फीचर इम्प्रूमेंट प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वाढवण्यासाठी डेव्हलप करण्यात येणार आहे.