Itel A05s : फक्त 6,499 रुपयांत लाँच झाला ‘हा’ Mobile; मिळतात हे खास फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Itel आपल्या ग्राहकांना सातत्याने नवनवीन आणि स्वस्त मोबाईल घेऊन येत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत Itel चे स्मार्टफोन सवस्त असल्याने ग्राहकांना सुद्धा खरेदी करणं सोप्प जाते. आताही कंपनीने स्वस्तात मस्त असा एक नवीन मोबाईल भारतात लाँच केला आहे. Itel A05s असे या मोबाईलचे नाव असून तुम्ही हा मोबाईल अगदी 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊया.

   

स्पेसिफिकेशन-

Itel A05s या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचचा LCD + HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 270 PPI पिक्सेल डेन्सिटी आणि 60 HZ रिफ्रेश रेट सह येतो. मोबाईल मध्ये तुम्हाला UNISOC SC9863A OctaCore प्रोसेसर उपलब्ध करण्यात आला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. कंपनीने मोबाईल मध्ये 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. तुम्ही मेमरी कार्डच्या माध्यमातून हे स्टोरेज वाढवू शकता.

कॅमेरा– Itel A05s

Itel A05s च्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये  5 मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा मिळतो तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सलकाह फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा सोबतच LED फ्लॅश देखील उपलब्ध आहे. itel कंपनीने हा स्मार्टफोन नेब्युला ब्लॅक, मिडो ग्रीन, क्रिस्टल ब्ल्यू आणि ग्लोरीयस ऑरेंज या कलर ऑप्शन मध्ये  लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 7.5 तासांसाठी टॉकटाईम आणि 32 दिवसांपर्यंत स्टँड बाय टाइम ऑफर केला आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Itel A05s या स्मार्टफोनमध्ये  साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G Volt, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध केले आहे. या मोबाईलमध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात अली असून ही बॅटरी 10 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा मोबाईल तुम्ही फक्त 6,499 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता.