itel A70 : 12GB रॅमसह itel ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात परवडणाऱ्या किमतीत मोबाईल विक्री करणारी कंपनी म्हणून itel ओळखली जाते. आताही itel ने ग्राहकांना बजेट मध्ये बसेल असा मोबाईल लाँच केला आहे. itel A70 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 12GB ची मजबूत रॅम मिळत आहे. या मोबाईल मध्ये डायनामिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून यामुळे तुम्हाला बॅटरी आणि इनकमिंग कॉल यासारखे नोटिफिकेशन स्क्रीनच्या वर दिसतात. कंपनीने हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये उपलब्ध केला आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

itel A70 या स्मार्टफोनमध्ये 60 hz रिफ्रेश रेट सह 6.6 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले hd + रिझोल्युशन तसेच 120hz टच सॅम्पलिंग रेट, 20:9 आस्पेक्ट रेशो, 90% स्क्रीन टू बॉडी रेशो, 500 निट्स ब्राईटनेस ऑफर करतो. या मोबाईल मध्ये अप्रतिम परफॉर्मन्ससाठी एंट्री लेवल UniSoc T603 चीपसेट बसवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो.

स्टोरेज – itel A70

itel A70 मध्ये कंपनीने ३ स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या मोबाईलच्या बेस मॉडेल मध्ये 3 GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच 4 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज आणि रॅम वाढवण्यासाठी एक्सटेंडेड 8 GB रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड सपोर्ट देखील यामध्ये मिळतंय. या मोबाईल मध्ये बॅकअप साठी 5000 mAh बॅटरी वापरण्यात आली आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यानुसार AI टेक्नॉलॉजी सह 13 MP प्रायमरी कॅमेरा, 0.3 MP सेकंडरी कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सोबत LED फ्लॅश देखील उपलब्ध आहे.

किंमत किती?

itel A70 या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने अजून या स्मार्टफोनच्या किमती उपलब्ध केलेल्या नाहीत. परंतु अंदाजे किंमत 7,490 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोन स्लिम आणि हलका असून याचे डायमेन्शन 8.6mm एवढे आहे. या फोन मध्ये कंपनीने साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, 4G LTE, 3.5 mm ऑडियो जॅक, ब्लूटूथ, GPS , यूएसबी टाइप-सी पोर्ट हे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील दिले आहेत.