7,000mAh बॅटरी वाला Mobile लाँच; किंमत फक्त 8,099

टाइम्स मराठी । मोबाईल निर्माता कंपनी इंटेलने आपला नवीन स्मार्टफोन इंटेल P40 प्लस अगदी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये पंच होल कटआउट डिस्प्ले यासह 7000 mah बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीने बॅटरी सोबतच दोन दिवसाचा बॅकअप देण्याचा दावा केलेला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, कॅमेरा क्वालिटी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

   

6.8 इंचाचा डिस्प्ले –

इंटेल P40 प्लस हा मोबाईल ड्युअल सिम सपोर्ट आणि अँड्रॉइड 12 सह उपलब्ध असून यामध्ये 6.8 इंचचा HD प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्लेला 90 हर्टज रिफ्रेश रेट आणि 720 ×1640 पिक्सल रिझोल्युशन मिळतो. मोबाईल मध्ये ऑक्टा कोअर युनिसोक T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. Itel P40 plus मध्ये 4 GB रॅम 128 GB स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास Itel P40 plus मध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय.

7000 mAh बॅटरी –

इंटेल P40 प्लस या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनला तब्बल 7000 mAh बॅटरीदेण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Itel P40+ बॅटरी 18 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम, 72 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक आणि एका चार्जवर 41 तासांपर्यंत चालते. मोबाईलच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, 4G, 3.5 mm ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट, फेस अनलॉक आणि बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन साठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेले आहे.

11 जुलैपासून खरेदी –

इंटेल P40 प्लस या मोबाईलची किंमत फक्त 8,099 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा हा मोबाईल परवडणारा आहे. तुम्ही 11 जुलैपासून अमेझॉन वरून हा मोबाईल खरेदी करू शकतात. तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ICICI बँक कार्ड आणि SBI कार्ड वरून पेमेंट केले तर तुम्हाला या मोबाईल खरेदीवर 10 टक्के सूट मिळू शकते.