लवकरच येतोय देशातील सर्वात स्वस्त 5G Mobile; किंमत अगदी परवडणारी

TIMES MARATHI | आज-काल सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या 5G स्मार्टफोन सेगमेंट मध्ये एन्ट्री करत आहे. यासोबतच बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यापूर्वी जिओ सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे उघड झालं होतं. परंतु आता iTel कंपनी पहिला स्वस्तात मस्त 5Gमार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन देशातील सर्वात स्वस्त मोबाईल असणार आहे. iTel P55 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.

   

iTel P55 5G हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार हा 5G स्मार्टफोन कमी रेंज मध्ये उपलब्ध असलेला पहिला स्मार्टफोन असेल. Itel कंपनी नेहमीच कमीत कमी किमतीत स्मार्टफोन लॉन्च करण्यावर भर देत असते. त्यानुसार यापूर्वी iTel कंपनीने A60s आणि Itel P40 हे दोन स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केले होते. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 6499 आणि 8099 अशी होती.

iTel A60s हा स्मार्टफोन 6.6 इंच च्या एचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. या फोनमध्ये युनिसॉक SC9863A1 प्रोसेसर देण्यात आले होते. यासोबतच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज यासह कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आणि iTel P40 हा स्मार्टफोन 6.8 इंच च्या एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले सोबत उपलब्ध करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये युनिसॉक T606 प्रोसेसर देण्यात आले होते. यासोबतच कंपनीने यामध्ये 7000 mAh बॅटरी प्रदान केली होती ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.

iTel P55 या स्मार्टफोनबद्दल अजूनही कोणतीच इन्फॉर्मेशन उपलब्ध नसून परंतु हा स्मार्टफोन दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात येऊ शकतो. आणि भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून ओळखला जाऊ शकतो अशी आशा आहे. या मोबाईल बद्दल आणखीन कोणतेच डिटेल्स उपलब्ध करण्यात आलेले नाही.