भारतातील सर्वात स्वस्त 5G Mobile लाँच; या कंपनीने केला कारनामा

टाइम्स मराठी । आज-काल सर्वच Mobile निर्माता कंपन्या 5G स्मार्टफोन सेगमेंट मध्ये एन्ट्री करत आहे. दुसरीकडे ग्राहक वर्ग मात्र बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करता असतात. यापूर्वी जिओ सर्वात स्वस्त असा 5G मोबाईल लॉन्च करणार असल्याचे उघड झालं होतं. परंतु आता iTel कंपनीने पहिला स्वस्तात मस्त 5G Mobile भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांना अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाला आहे. iTel P55 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून आज आपण या मोबाईलची किंमत आणि त्यामध्ये असलेल्या फीचर्स बद्दल जाणून घेणार आहोत.

   

iTel P55 5G हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. बाजारात या मोबाईलची किंमत 9699 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज एजंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील 4GB + 64 GB या बेस वेरीएंट ची किंमत 9699 रुपये एवढी आहे तर 6GB + 128GB स्टोरेज वेरीएंटची किंमत 9,999 रुपये आहे. म्हणजेच अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा परवडेल अशी मोबाईलची किंमत आहे. हा स्मार्टफोन 4 ऑक्टोंबर पासून ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

6.6 इंच डिस्प्ले –

iTel P55 5G या 6.6 इंच च्या एचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले 1612×720 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 hz रिफ्रेश रेटसह येतो . हा फाईव्ह जी स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएस वर बेस्ड आहे. त्याचबरोबर मोबाईलमध्ये प्रोसेसिंग साठी 2.4 गीगा हर्ट्स वर बेस्ड असलेला मीडियाटेक डायमेनसिटी 6080 आफ्टर कोर प्रोसेसर देण्यात आले आहे.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास iTel P55 5G मध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा आहे. तसेच या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.