Itel P55T : फक्त 8,199 रुपयांत लाँच झाला 50 MP कॅमेरावाला मोबाईल

Itel P55T : प्रसिद्ध ब्रँड Itel चे मोबाईल किमतीला अतिशय स्वस्त असतात. इतर कंपन्यांचा तुलनेत Itel च्या मोबाईलची किंमत कमी असली तरी फीचर्स मात्र जबरदस्त पाहायला मिळतात. ग्राहक सुद्धा परवडणारा मोबाईल म्हणून Itel च्या स्मार्टफोनला मोठी पसंती दर्शवतात. आताही कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा मोबाईल बाजारात आणला आहे. Itel P55T असे या मोबाईलचे नाव असून हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो Android 14 Go Edition वर चालतो. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

Itel P55T मध्ये 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट सह 6.6-इंचाचा HD + रिझोल्यूशन पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला असून जस आम्ही सांगितलं कि हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो Android 14 Go Edition वर वर्क करतो. Itel P55T मध्ये 6 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोन मध्ये 4G, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, GNSS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कॅमेरा – Itel P55T

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला ५० MP चा मुख्य कॅमेरा तसेच AI सेंसर आणि LED लाईट आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Itel P55T हा स्मार्टफोन कंपनीने 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच केला आहे.

किंमत किती ?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Itel P55T हा स्मार्टफोन 8,199 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. इतर मोबाईल कंपन्यांच्या तुकनेत हि किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सुद्धा आरामात हा मोबाईल विकत घेऊ शकतात. तुम्ही हा स्मार्टफोन गोल्ड, अरोरा ब्लू आणि मूनलाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.