Itel S24 : फक्त 9999 रुपयांत लाँच झाला 108MP कॅमेरावाला मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी itel आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त मोबाईल लाँच करत असतात. ग्राहकांना कमी पैशात उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. आताही itel ने बाजारात एक नवा मोबाईल आणला आहे. Itel S24 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना 108MP चा अतिशय मस्त असा कॅमेरा उपलब्ध करण्यात आलाय. महत्वाचे म्हणजे या मोबाईलची सुरुवातीची किंमत फक्त 9999 रुपये आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे खास फीचर्स आज आपण जाणून घेऊयात ….

   

6.6-इंचाचा डिस्प्ले-

Itel S24 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1612 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 480 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Helio G91 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन OS 13.5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईलमध्ये 8 GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं असून वर्चुअल रॅमद्वारे हीच रॅम तुम्ही 8GB पर्यंत आणखी वाढवू शकता.

कॅमेरा

Itel S24 स्मार्टफोनमध्ये 108MP अल्ट्रा क्लिअर कॅमेरा आहे, जो AI पॉवर्ड मोड आणि वैशिष्ट्यांसह येतो. याशिवाय मोबाईलच्या समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करण्यात आलाय. पॉवरसाठी ग्राहकांना 5000mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या मोबाईल यामध्ये ड्युअल डीटीएस स्पीकर आणि रंग बदलणारे डिझाइन यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती? Itel S24

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, कंपनीने Itel S24 च्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ॲमेझॉनच्या माध्यमातून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या मोबाईल सोबत ग्राहकांना ९९९ रुपयांचे Itel 42 घड्याळही मोफत मिळेल. हा स्मार्टफोन पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.