Japan Slim Mission : जपानच्या चंद्रावरील यानाने पाठवला पृथ्वीचा खास फोटो; बघा नक्की कशी दिसतेय पृथ्वी

टाइम्स मराठी । भारताचे चांद्रयान 3 हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर जपानने देखील चंद्रावर त्यांचे यान पाठवलं आहे. जगभरातील खगोल शास्त्रज्ञांचे जपानच्या या चंद्रयान मिशन कडे (Japan Slim Mission) लक्ष लागलेले आहे. जपान ने चंद्रावर लँडिंग केल्यानंतर हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पाचवा देश ठरेल. जपानचे हे चांद्रयान मिशन सहा महिन्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. स्लिम असं या यानाचे नाव असून या जपानच्या या यानाच्या लॅन्डरने शास्त्रज्ञांना पृथ्वीचा पहिला फोटो क्लिक करून पाठवला आहे. या फोटोमध्ये अर्धी पृथ्वी दिसत असली तरीही अतिशय सुंदर प्रकारे दिसत आहे.

   

कधी लाँच झालं जपानचे मिशन मून – Japan Slim Mission

6 सप्टेंबरला स्लिम लँडर हे H2A या रॉकेट च्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. त्यावेळी यानाने पृथ्वीच्या कक्षेत राहून बऱ्याच चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या. यासोबतच स्लिमने एक टेस्टचा भाग म्हणून पृथ्वीचे फोटो क्लिक करून पाठवला आहे. हा फोटो पृथ्वीपासून एक लाख किलोमीटर अंतरावरून क्लिक करण्यात आला असून जाक्साने ट्विटरवर असलेल्या सलीमच्या अकाउंटवर हे फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

स्लिम यानाच्या लॅन्डरचा (Japan Slim Mission) कॅमेरा वेगळ्या प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे. यामुळे चंद्रावरील वेगवेगळ्या विवरांची ओळख होईल. या लँडर मध्ये वेगवेगळी नेवीगेशन सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे. जपानने पाठवलेल्या स्लिम यानाला चंद्राचा स्नायपर असं देखील म्हटलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार जपानचे हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी तीन-चार महिने लागतील. आणि पुढच्या वर्षी हे यान चंद्रावर लँड होऊ शकते. भारताच्या चांद्रयान 3 मिशन नंतर आता सर्व जगाचे जपानच्या ह्या चंद्रयान मिशन कडे लक्ष लागून आहे.