Jawa 350 भारतात लाँच; 334cc इंजिन अन बरंच काही.. किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतात स्पोर्ट बाईकचे आकर्षण खूप आहे. खास करून तरुणाईच्या मनात स्पोर्ट बाईकचे वेड आहे. दिसायला मजबूत आणि चालवायलाही दणकट असलेल्या गाड्या तरुणांना आवडतात. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत एकामागून एक स्पोर्ट बाईक लाँच होत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी जावा मोटरसायकलने अपडेटेड फीचर्ससह Jawa 350 ही बाईक मार्केट मध्ये लाँच केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 2.14 लाख रुपये ठेवली आहे. ही बाईक भारतीय बाजारात रॉयल एनफील्डला तगडी फाईट देईल. आज आपण या स्पोर्ट बाईकचे खास फीचर्स जाणून घेऊयात…

   

लूक आणि डिझाईन –

गाडीच्या लूक आणि डिझाईन बाबत सांगायचं झाल्यास, आधीपेक्षा यात जास्त असा काय फरक जाणवत नाही. परंतु ही नवी Jawa 350 बाईक संपूर्ण रेट्रो डिझाइनमध्ये डेव्हलप केलेली दिसते. बाईकचे वजन 192 किलो असून सीटची उंची 790mm आहे आणि तिला 178mm इतका ग्राउंड क्लिअरन्स मिळतोय . याशिवाय या बाईक मध्ये 18-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल रीअर शॉक, ड्युअल-चॅनल एबीएस, दोन्ही बाजूना डिस्क ब्रेक्स आहेत.

इंजिन – Jawa 350

नव्या Jawa 350 मध्ये 334cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड गियरबॉक्स ला जोडलेलं असून 7,000rpm वर 22bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 5,000rpm वर 28Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यापूर्वीच्या Jawa 350 मध्ये 294cc इंजिन होते म्हणजेच इंजिन मध्ये कंपनीने बदल केला आहे.

किंमत किती?

Jawa 350 च्या या अपडेटेड मॉडेलची एक्स शोरूम किंमत 2.51 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ही बाईक नवीन मिस्टिक ऑरेंज, काळ्या आणि मरून रंगात खरेदी करू शकता. मार्केट मध्ये ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350, हंटर 350 आणि होंडा सीबी350 यांसारख्या गाड्यांशी थेट सामना करेल.