Jawa Yezdi ने केरळमध्ये बाईक ओनर साठी  केली सर्विस कॅम्पची घोषणा  

टाइम्स मराठी । Jawa Yezdi कंपनीच्या बाईक्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जातात. आता कंपनीने  केरळ मध्ये बाईक्स ओनर साठी सर्विस कॅम्पची घोषणा केली आहे. कंपनीने 2019- 20 या  वर्षात विक्री केलेली JAWA आणि YEZDI या बाईकच्या सिरीज साठी चार दिवस हा सर्विस कॅम्प सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार 14 ते 17 डिसेंबर  या काळामध्ये कोची आणि  केरळ मध्ये हा कॅम्प घेण्यात येईल. या सर्विस गेम च्या माध्यमातून  बाईकची सर्विसिंग फ्री मध्ये  करण्यात येणार आहे. यामध्ये मोटुल, अमरॉन, सीएट टायर्स यासारखे मेन प्रॉडक्ट विक्रेते देखील  सहभागी होतील.

   

Jawa Yezdi कंपनीच्या या सर्विस कॅम्पच्या माध्यमातून कंपनीला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या सर्विस कॅम्प मध्ये बाईकची पूर्णपणे सर्विसिंग केली जाईल. यासोबतच  एक्सचेंज आणि बायबॅक  मूल्यमापन सुविधा देखील कंपनीकडून देण्यात येईल. त्यानुसार ग्राहकांना बाईक एक्सचेंज करण्यासाठी  एक योग्य जागा प्रदान करण्यात येईल. या सर्विस कॅम्पचा मूळ हेतू अपग्रेड प्रक्रिया जास्त सुलभ करणे हा आहे. यासोबतच  दक्षिण भारतातील रायडींग ग्रुपशी संपर्क मजबूत करण्याचा  उद्देश कंपनी ठेवते. 

Jawa Yezdi निर्माता कंपनीकडून सुरू करण्यात येणाऱ्या सर्विस कॅम्प नंतर  मेगा सर्विस कॅम्प बंगळुरू, चेन्नई, कलकत्ता, हैदराबाद यासह दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये असेल. JAWA YEZDI बाईक्स असलेल्या ओनरला संपूर्ण सर्व्हिसिंग सह रायडिंग सीजन पूर्वी बाईकची सर्विस करण्याची खास संधी या कॅम्प च्या माध्यमातून मिळेल. ग्राहकांना अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन डिटेल साठी जवळच्या डीलरशिप ला भेट द्यावी लागेल.