दिवाळीला घरी आणा Jawa Yezdi बाईक; पहा काय आहे ऑफर?

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला फक्त आठवडा उरला आहे. दिवाळीला वाहन खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून बऱ्याच ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट वर बंपर डिस्काउंट ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध करत आहेत. अशातच मोटर सायकल निर्माता Jawa Yezdi या कंपनीने फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून वाहनांवर स्पेशल ऑफर्स उपलब्ध केले आहेत. तुम्ही देखील यंदा दिवाळीला Jawa Yezdi कंपनीची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कंपनीने उपलब्ध केलेल्या डिस्काउंट ऑफर.

   

Jawa Yezdi भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या फीचर सह वाहन लॉन्च करत असते. ही बाईक भारतात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित देखील करते. आता कंपनीने दिवाळी फेस्टिवल निमित्त बाईक वर आकर्षक EMI प्लॅन, एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे. जाणून घेऊया काय आहे ऑफर.

फायनान्स प्लॅन

Jawa Yezdi बाईक्स वर दिवाळी निमित्त फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे. तुम्ही फायनल प्लॅनच्या माध्यमातून बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनी 1,888 रुपयांपासून सुरू असलेले EMI ऑफर देत आहेत. यासोबतच दिवाळीपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्व बाईक्स वर  चार वर्षासाठी 50,000 KM वॉरंटी देखील देण्यात येत आहे. या दिवाळी फेस्टिवल प्लान च्या माध्यमातून ग्राहकांना मानसिक शांती देणे आणि JAWA YEZDI ब्रँड सर्वांपर्यंत पोहोचावे हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.

फीचर्स

JAWA YEZDI मोटर सायकल लाईनअप मध्ये जावा,  Jawa 42, Jawa 42 बाबर,  Jawa पेराक, येजडी रोडस्टर, येजडी स्क्रेम्बलर, येजडी एडवेंचर, या सर्व वाहनांचा समावेश होतो. या सर्व बाईकची रेंज शहरांमध्ये वाढवण्यासाठी आणि जास्त उपयोगी बनवण्यासाठी कंपनीने या रेंजमध्ये मेकॅनिक आणि कॉस्मेटिक अपडेट्स केले आहेत. यासोबतच कंपनीने टोटल बॉडी मध्ये देखील अपडेट केले आहेत. या बाईक्समध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे.