भारतात Jeep Compass 2WD डिझेल व्हेरियंट लॉन्च; जाणून घ्या किमत आणि फीचर्स

TIMES MARATHI | नुकतेच Jeep India ने भारतात नवीन 2WD ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Compass SUV चे डिझेल व्हेरियंट लॉन्च केले आहे. या Compass SUV ची शोरूम किंमत 23.99 लाख रुपये एवढी आहे. यापूर्वी जीपने 2021 मध्ये फेसलिफ्टसह कंपास एसयूव्ही अपडेट केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिला अपडेट करण्यात आले आहे. या अपडेट वर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स जीपने दिले आहे.

   

प्रकार?


भारतात जीप कंपास पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात स्पोर्ट, लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड+, लिमिटेड आणि मॉडेल एस यांचा समावेश आहे. यामध्ये पॅनोरामिक सनरूफ लाँगिट्युड प्लस उपलब्ध आहे. अपडेटेड जीप कंपासमध्ये एक नवीन ब्लॅक शार्क एडिशन प्रकार देखील उपलब्ध आहे. ज्याला इग्नाइट रेड हायलाइट्ससह सर्व-ब्लॅक इंटीरियर्स आणि ब्लॅक अलॉय व्हील देण्यात आले आहेत.

किंमत

Compass SUV मधील आतील भाग पूर्णपणे काळा आहे. ज्यामुळे याला स्पोर्टी लुक मिळतो. अपडेटेट SUV पूर्वीपेक्षा सुमारे 20% अधिक किफायतशीर झाली आहे. जीप कंपासची एक्स-शोरूम किंमत 23.99 लाखपासून सुरू होते. तर क्लब एडिशनची ऑन-रोड किंमत 24.37 लाख रुपयांपर्यंत जाते. टॉप व्हेरियंट जीप कंपास ऑन-रोड किंमत 37.96 लाख रुपये आहे.

पॉवरट्रेन

कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे तर, जीप कंपासच्या 2WD रेड ब्लॅक एडिशनमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 168 हॉर्सपॉवरची शक्ती आणि 50 Nm कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ते 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. नवीन मॉडेल 16.2 किमी/लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. ही SUV फक्त 9.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते.

कोणाशी स्पर्धा करणार?


जीप कंपासचा हा नवीन प्रकार Hyundai Alcazar, Tata Harrier आणि Tata Safari च्या टॉप-एंड प्रकारांशी स्पर्धा करेल. सध्या बाजारात कंपासला जास्त मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे इतर वाहने या स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता आहे.