ADAS फीचर्ससह Jeep ने लाँच केली अपडेटेड Compass SUV

टाइम्स मराठी । सध्या ऑटोमोबाईल मार्केट चांगल्याच तेजीत आहे. दररोज नवनवीन गाड्या बाजारात येत आहेत. तर काही कंपन्या आपल्या जुन्या मॉडेललाच अपडेटेड फीचर्ससह मार्केट मध्ये नव्याने लाँच करत आहेत. ऑटोमोबाईल मार्केट मध्ये सुद्धा सर्वच कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने ग्राहकांची मने जिंकून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत. मार्केट मध्ये एकूण अशी परिस्थिती असताना आता प्रसिद्ध कंपनी Jeep ने आपली Compass SUV ADAS फीचर्ससह नव्याने बाजारात लाँच केली आहे. आज आपण या कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

   

ही नवी अपडेटेड Jeep Compass SUV तुम्हाला ४ ट्रिम मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये Altitude, Summit, Overland आणि Trailhawk ट्रिमचा समावेश आहे. गाडीच्या इंटेरिअर मध्ये आधीपेक्षा जास्त असे विशेष बदल केलेले नाहीत. परंतु या SUV ची केबिन आधीपेक्षा जास्त आकर्षक दिसते. या कार मध्ये हिल असिस्ट (HA) आणि हिल डिसेंट कंट्रोल (HDC) मोड देखील देण्यात आले आहेत. या कार मध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान डेव्हलप करण्यात आले आहे. तसेच यामध्ये क्लास A+ 18-इंच आणि 19-इंच टायर सोबत नवीन इन-कार कनेक्टेड फीचर्स देखील मिळतात.

इंजिन –

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, अपडेटेड Jeep Compass SUV मध्ये 2.0-लिटर मल्टीजेट डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. . हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असून 168 bhp पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये पर्यायी 4WD सेटअप देखील उपलब्ध आहे.

अन्य फीचर्स –

गाडीच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, SUV मध्ये ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्शन, 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह 10.25-इंच फ्रेमलेस फुल्ल कलर TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्ज, ABS सिस्टीम, ESC (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल), TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), रोलओव्हर मिटिगेशन, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळतात. या नव्या अपडेटेड Jeep Compass SUV ची एक्स-शोरूम किंमत 20.49 लाख ते 32.07 लाख रुपये आहे.