अमेरिकन कार निर्माता कंपनी Jeep लवकरच लॉन्च करणार Avenger; एवढी असू शकते किंमत

टाइम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची विक्री सुद्धा सातत्याने देशात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन कार निर्माता कंपनी JEEP लवकरच भारतात आपली नवी SUV कार लाँच करणार आहे. Jeep Avenger असे या कारचे नाव असून ही SUV कार भारतामध्ये एप्रिल महिन्यामध्ये लॉन्च होऊ शकते. ही मिड साइज SUV कार असून पेट्रोल वर्जन मध्ये उपलब्ध होणार आहे.  त्यानंतर 2026 मध्ये कंपनीकडून या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्यात येईल. या SUV ची किंमत 8 ते 12 लाख रुपयांमध्ये असेल. आज आपण जाणून घेऊया या गाडीच्या फीचर्स बद्दल.

   

फिचर्स

Jeep Avenger या SUV मध्ये अमेरिकी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात येतील. ही कॉम्पॅक्ट SUV मस्क्युलर कार प्रमाणे लूक प्रदान करेल. यामध्ये सात बॉक्स फ्रंट ग्रील, LED हेडलॅम्प, 18 इंच अलॉय व्हील, ड्युअल टोन पेंट स्कीम, स्मोक्ड टेललॅम्प हे फीचर कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये देण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर या SUV च्या केबिन मध्ये फ्री स्टँडिंग टच इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यासारखे फीचर्स या Jeep Avenger मध्ये मिळू शकतात.

बाजारात कोणाला देणार टक्कर –

Jeep Avenger ही कॉम्पॅक्ट SUV भारतीय बाजारात Maruti Brezza, Nissan Magnite, Kia Sonet, Renault Kiger, Hyundai Venue, Mahindra XUV 300, Tata Nexon, Toyota Urban Cruiser.या गाडयांना टक्कर देईल. या कंपनीकडून या SUV चे बरेच व्हेरिएन्ट भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार या कारच्या किमतीत देखील वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.