टाइम्स मराठी । तुम्ही जर नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण प्रसिद्ध कंपनी रिलायन्स येत्या वर्षअखेरीस आपला स्वस्तात मस्त JioPhone 5G लाँच करू शकते. या मोबाईलचे काही डेमो फोटोही समोर आले असून तुम्हाला हा मोबाईल १० हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो. सोशल मीडियावर अर्पित पटेल नावाच्या एका युजरने या मोबाईलचे काही फोटो शेअर केले आहेत.
जिओचा हा 5G यंदाच्या दिवाळी किंवा वर्षाच्या अखेरीस लाँच होऊ शकतो. याची किंमत 10 हजार रुपये किंवा यापेक्षा कमी असू शकते. त्यामुळे हा स्मार्टफोन नक्कीच सर्वसामान्यांना परवडणारा असेल. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मोबाईल ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असून ड्युअल सिम कॅमेरा यामध्ये असणार आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा हा 13 मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा 5 MP असू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.
फीचर्स काय असतील?
Jio च्या या अपकमिंग मोबाईल मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये Unisoc 5G चिपसेट किंवा Dimensity 700 सिरीज चा प्रोसेसर मिळू शकतो. तसेच मोबाईल मध्ये 4GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मिळू शकेल. त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 18 W चार्जिंगला सपोर्ट करू शकेल. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, ड्युअल सिम स्लॉट आणि n3, n5, n28, n40 आणि n78 5G ब्रँड साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर अशा फीचर्स ने हा मोबाईल परिपूर्ण आहे.