Jio AirFiber : आता फ्री मध्ये घ्या Jio AirFiber चे कनेक्शन; कंपनीने आणली खास ऑफर

टाइम्स मराठी । रिलायन्स जिओ या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर Jio AirFiber सर्विस लॉन्च केली होती. ही सर्विस लाँच झाल्यानंतर  त्याचा फायदा आतापर्यंत 250 पेक्षा जास्त शहरांना मिळाला आहे. Jio AirFiber हे Airtel च्या Xstream Air Fiber सोबत प्रतिस्पर्धा करते. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हीं सर्विसेसमध्ये 5G  इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर फायबरच्या माध्यमातून युजर्सला घरी इंटरनेट  वापरण्याची सुविधा मिळते. परंतु यासाठी पूर्वीप्रमाणे राऊटर किंवा फायबर केबल ची गरज भासत नाही. विना केबल  तुम्ही या इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही देखील या सर्विस चा लाभ घेऊ इच्छित असाल तर, रिलायन्स जिओ कडून  ग्राहकांना Jio AirFiber चे कनेक्शन फ्री मध्ये ऑफर करण्यात येत आहे.

   

Jio AirFiber सर्विसेस देशभरातील 262 शहरांमध्ये कनेक्ट करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ कंपनीने Jio AirFiber ही नवीन वायरलेस सर्विस दोन व्हेरिएंट मध्ये  लॉन्च केली होती. त्यापैकी एक म्हणजे जिओ एअर फाइबर  आणि दुसरे म्हणजे जिओ एअर फाइबर मॅक्स हे आहे. होम एंटरटेनमेंट साठी फुल सोल्युशन असल्याचे देखील कंपनीने सांगितले होते. म्हणजेच इंटरनेट, टीव्ही, OTT या सर्वांसाठी तुम्हाला कोणत्याच गोष्टींची गरज भासणार नाही.

काय आहे ही सर्विस

Jio AirFiber च्या माध्यमातून 550 हाय डेफिनेशन डिजिटल टीव्ही चॅनल आणि फेवरेट शो ग्राहक पाहू शकतात . या सोबतच सबस्क्राइबर्सला 16 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स  देखील एकाच ठिकाणी मिळतील. हे ॲप तुम्ही वेगवेगळ्या डिवाइस वर चालवू शकतात. Jio AirFiber ही वायरलेस एक्सेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ही सिस्टीम सिम्पल प्लग अँड प्लेस डिवाइस सह उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही त्या ठिकाणी या सर्विसचा फायदा होऊ शकतो.  म्हणजेच ग्रामीण भागामध्ये Jio AirFiber चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

मिळेल 14 OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन

रिलायन्स जिओ ने ही नवीन इंटरनेट सर्विस लॉन्च करताना युजर्स ला true 5G स्पीड चा फायदा होईल असं सांगितलं होतं. Jio AirFiber सह कंपनी 14 OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रीप्शन  फ्री मध्ये देत आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, जिओ सिनेमा, सोनी लिव, hoichoi, डिस्कवरी प्लस, अल्ट बालाजी, zee 5, Sun NXT, Lionsgate Play, shemmarooMe, DocuBay, Universal plus, Epic On, Eros Now यांचा समावेश आहे.

Jio AirFiber प्लॅन ची किंमत

या Jio AirFiber सबस्क्रीप्शन प्लान ची किंमत 599 पासून 3999 रुपयांपर्यंत आहे. जिओ एअर फायबरच्या प्रत्येक प्लॅन सोबत अनलिमिटेड इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.  यामध्ये देण्यात येणाऱ्या इंटरनेटची स्पीड ही 30 MBPS  ते 1GBPS एवढी असेल. त्यानुसार फास्ट इंटरनेट ब्राउझिंग चा आनंद घेता येऊ शकतो.

तर भरावी लागणार नाही इन्स्टॉलेशन फीस

Jio AirFiber सर्विस चे कनेक्शन घेण्यासाठी1000 रुपयांची इन्स्टॉलेशन फीस भरावी लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाची उपकरण इन्स्टॉल केले जाते. जर तुम्ही कोणत्याही रिचार्ज प्लान सोबत एनुअल प्लॅन घेऊ इच्छित असाल तर  तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्ज भरावे लागणार नाही. यानुसार तुम्ही 1 वर्षापर्यंत हाय स्पीड इंटरनेट साठी पैसे भरल्यास त्याचे इन्स्टॉलेशन कंपनीकडून फ्री मध्ये मिळेल. 

अशा पद्धतीने करा फ्री मध्ये कनेक्शन

Jio AirFiber सर्विसचे फ्री मध्ये कनेक्शन करण्यासाठी माय जिओ ॲप वर जा. किंवा jio.com वेबसाईटवर जाऊन एअर फायबर सेक्शन मध्ये जा.
त्यानंतर तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या भागात एयर फायबर सर्विस उपलब्ध आहे की नाही हे समजेल.
जर तुमच्या एरियामध्ये ही सेवा उपलब्ध असेल तर निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये तुम्हाला ‘Get Jio AirFiber  ऑप्शन मिळेल.
या ऑप्शनवर टॅप केल्यास कंपनी तुमच्या सोबत संपर्क साधेल.
त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला एनुअल प्लॅन निवडावा लागेल.

कनेक्शन घेण्यासाठी या नंबर वर द्या मिस कॉल

जिओ एअर फायबरचे कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 60008-60008 या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल. किंवा तुम्ही या नंबर वर whatsapp करून देखील बुकिंग करू शकतात. रिलायन्स जिओच्या ऑफिशियल वेबसाईट आणि  जिओ स्टोअर वरून देखील जिओ एअर फायबर कनेक्शनची बुकिंग करता येते. जिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या बिल्डिंग पर्यंत सर्विस पोहोचवेल. जेणेकरून तुम्हाला कनेक्शन मिळेल.