Jio Airfiber लाँच!! किंमत किती? कसं घ्याल कनेक्शन? पहा संपूर्ण माहिती

टाइम्स मराठी । गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर रिलायन्स Jio कंपनीने Jio Airfiber सर्विस लॉन्च केली आहे. Jio ने देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये ही सुविधा लॉन्च केली असून या एअर फायबरची टक्कर Airtel च्या एक्स्ट्रीम एअर फायबर सोबत आहे. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर फायबरच्या माध्यमातून युजर्सला घरी इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळते. त्यासाठी पूर्वी वापरण्यात येणारे राऊटर आणि फायबर केबल वापरण्याची गरज भासत नाही. यापूर्वी ही सुविधा भारतीय एअरटेल वायरलेस होम कनेक्शनने आणली होती.

   

रिलायन्स जिओ कंपनीने या नवीन वायरलेस सर्विसला 2 व्हेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ एअर फाइबर आणि दुसरा म्हणजे जिओ एअर फाइबर मॅक्स. जिओ कंपनीने याबाबत सांगितले की हे डिवाइस होम एंटरटेनमेंटसाठी फुल सोल्युशन आहे. म्हणजेच इंटरनेट, टीव्ही, ओटीपी या सर्वांसाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टींची गरज पडणार नाही. जिओ एअर फायबर च्या माध्यमातून 550 HD डिजिटल टीव्ही चॅनल आणि फेवरेट शो ग्राहक पाहू शकतील. या सोबतच सबस्क्राइबर्सला 16 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स देखील एकाच ठिकाणी मिळतील. हे ॲप तुम्ही वेगवेगळ्या डिवाइस वर चालवू शकतात.

एअर फायबर म्हणजे काय?

एअर फायबर म्हणजेच वायरलेस एक्सेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ही सिस्टीम सिम्पल प्लग अँड प्लेस डिवाइससह उपलब्ध असून यामुळे इंटरनेट स्पीड मिळू शकते. ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही त्या ठिकाणी हे उपयोगी पडू शकते. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

किती आहे किंमत? Jio Airfiber

Jio Airfiber च्या सस्क्रिप्शन प्लान ची किंमत 599 पासून 3999 रुपयांपर्यंत आहे. जिओ एअर फायबरच्या प्रत्येक प्लॅन सोबत अनलिमिटेड इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. यामध्ये देण्यात येणाऱ्या इंटरनेटचे स्पीड हे 30 MBPS ते 1GBPS इतकं आहे. त्यामुळे यूजर्सना फास्ट इंटरनेट ब्राउझिंगचा आनंद घेता येऊ शकतो. त्याचबरोबर जिओ एअर फायबरसह कंपनी 14 OTT प्लॅटफॉर्मचे सस्क्रिप्शन फ्रीमध्ये देत आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, जिओ सिनेमा, सोनी लिव, hoichoi, डिस्कवरी प्लस, अल्ट बालाजी, zee 5, Sun NXT, Lionsgate Play, shemmarooMe, DocuBay, Universal plus, Epic On, Eros Now यांचा समावेश आहे.

कसे घ्याल Jio Airfiber कनेक्शन?

Jio एअर फायबरचे कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 60008-60008 या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल. किंवा तुम्ही या नंबर वर whatsapp करून देखील बुकिंग करू शकतात. याशिवाय रिलायन्स जिओच्या ऑफिशियल वेबसाईट आणि जिओ स्टोअर वरून देखील जिओ एअर फायबर कनेक्शनची बुकिंग करता येते. जिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या बिल्डिंग पर्यंत सर्विस पोहोचवेल. जेणेकरून तुम्हाला कनेक्शन मिळेल.