Jio Airfiber Service Area : Jio ने ‘या’ 115 शहरात लॉन्च केली जिओ एअर फाइबर सर्विस

टाइम्स मराठी । रिलायन्स जिओ कंपनीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिओ एअर फायबर सर्विस (Jio Airfiber Service Area) लॉन्च केली होती. आता जिओ ने एअरटेल ला टक्कर देत आता आठ राज्यांमधील 115 शहरात जिओ एअर फायबर सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी कंपनीने आठ मेट्रो शहरांसाठी ही सुविधा सुरू केली होती. यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकत्ता, मुंबई आणि पुणे यांचा समावेश होता. आता कंपनीने 115 शहरांमध्ये सुरू केलेली ही एअर फायबर सर्विस ब्रॉडबँडच्या तुलनेत जास्त गती देते. तुम्ही हे एअर फाइबर 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी वापरू शकता.

   

गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर लॉन्च करण्यात आलेल्या जिओ एअर फाइबर सर्विसच्या माध्यमातून युजर्सला घरी इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळते. त्यासाठी पूर्वी वापरण्यात येणारे राऊटर आणि फायबर केबल वापरण्याची गरज भासत नाही. यापूर्वी ही सुविधा भारतीय एअरटेल वायरलेस होम कनेक्शन ने आणली होती. रिलायन्स जिओ सोबतच एअरटेल प्रमाणे काही कंपन्यांनी देखील ही सुविधा सुरू केली आहे. या कंपन्यांनी ऑप्टिक वायर टेक्नॉलॉजीचा वापर केला असून ही सुविधा फक्त काही शहरांपर्यंत सीमित आहे.

या राज्यांमध्ये सुरू आहे ही सर्विस- (Jio Airfiber Service Area)

रिलायन्स जिओ पूर्वी एअरटेल कंपनीने एक्स्ट्रीम एअर फायबर सुविधा उपलब्ध केली होती. ही एक्स्ट्रीम एअर फाइबर सुविधा दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू करण्यात आली होती. आता रिलायन्स जिओने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील 115 शहरांमध्ये ही सर्विस सुरू केली आहे.

2 प्लॅन ऑफर उपलब्ध-

तुम्ही देखील जिओ एअर फाइबर सर्विस (Jio Airfiber Service Area) चा लाभ घेऊ इच्छित असाल तर कंपनीकडून तुम्हाला २ प्लॅन ऑफर करण्यात येत आहे. यामध्ये एयर फायबर आणि एअर फायबर मॅक्स हे दोन प्लॅन उपलब्ध आहे. हे दोन्ही प्लॅन्स 6 आणि 12 महिन्यांसाठी व्हॅलिड असून या प्लानच्या किमती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही 6 महिन्यांचा कोणताही प्लान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 1000 रुपयांची इन्स्टॉलेशन फीस भरावी लागेल. यासोबतच 12 महिन्याच्या प्लॅनसाठी तुम्हाला इन्स्टॉलेशन फीस भरायची गरज भासणार नाही. तुम्हाला जिओ एअर फायबर बुक करण्यासाठी जिओच्या अधिकारी वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. याशिवाय जिओ ॲप किंवा कंपनीच्या कस्टमर केअर नंबर सोबत देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.