Jio AirFiber Vs Airtel Xstream AirFiber : कोणाचं स्पीड जास्त? खिशाला कोणता प्लॅन परवडेल?

टाइम्स मराठी । 19 सप्टेंबरला Jio AirFiber लॉन्च होणार आहे. याबाबत कंपनीने घोषणा केली आहे. मार्केट मध्ये Jio च्या AirFiber ची थेट टक्कर Airtel Xstream Air Fiber शी होणार यात शंकाच नाही. Jio AirFiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर फायबरच्या माध्यमातून युजर्सला घरी इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळते. त्यासाठी पूर्वी वापरण्यात येणारे राऊटर आणि फायबर केबल वापरण्याची गरज भासत नाही. ग्राहकांना चांगल्यात चांगल्या आणि परवडणाऱ्या सुविधा देण्याचे काम दोन्हीही कंपन्या देतात. अशावेळी Jio AirFiber कनेक्शन घ्यावं कि Airtel Xstream Air Fiber चा वापर करावा याबाबत आपल्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. चला तर आज आपण या दोन्ही AirFiber बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्यांची तुलना करूया. मग तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी काय बेस्ट ठरेल.

   

एअर फायबर म्हणजेच वायरलेस एक्सेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ही सिस्टीम सिम्पल प्लग अँड प्लेस डिवाइस सह उपलब्ध असून यामुळे इंटरनेट स्पीड मिळू शकते. ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही त्या ठिकाणी हे उपयोगी पडू शकते. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

किंमत किती ?

Airtel Xstream AirFiber ने ग्राहकांसाठी महिन्याचा प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. Airtel Xstream Air Fiber च्या कनेक्शनची किंमत 7733 रुपये आहे. यासोबतच एअर फायबर राउटर ची किंमत 2500 रुपये एवढी असून यासाठी रिफंडनेबल सिक्युरिटी अमाऊंट जमा करावी लागते. जिओ एअर फाइबर च्या किमती आणि प्लानबद्दल अजून माहिती मिळालेली नसली तरी Airtel पेक्षा जिओचे कनेक्शन अतिशय स्वस्तात असेल असं म्हंटल जात आहे. अंदाजे या कनेक्शन साठी 6,000 रुपये मोजावे लागू शकतात.

काय सुविधा मिळणार?

Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सहा आऊटर उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही कंपन्या 5g सिमकार्ड कनेक्शन देखील उपलब्ध करून देणार आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांकडून ॲपची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येऊ शकते. जेणेकरून राउटरला मॅनेज करण्यासाठी मदत होईल. एअर फायबरच्या राऊटरच्या माध्यमातून मल्टिपल डिव्हाइसेसला कनेक्ट करता येऊ शकते. एवढंच नाही तर ॲप मध्ये डिवाइस ची लिमिट सेट करता येऊ शकते.

स्पीड किती मिळेल?

सध्या, Airtel 100Mbps पर्यंत स्पीड देण्याचे वचन देत असून फक्त एकच प्लॅन ऑफर करत आहे. तर दुसरीकडे मात्र Jio ने 1Gbps चा 5G स्पीड देण्याचा दावा केला आहे. त्यामुळे अंबानींनी एकप्रकारे Airtel ला धोबीपछाड दिला आहे. जिओचे हे प्लॅन काय असतील आणि किती स्पीड असेल, याची माहिती 19 सप्टेंबरला मिळणार आहे.