Jio Bharat B1 : Jio चे ग्राहकांना मोठं गिफ्ट!! लाँच केला स्वस्तात मस्त 4G मोबाईल

टाइम्स मराठी । सध्या भारतात सर्वत्र सणासुदीचा काळ सुरु असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Jio ने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. Jio ने ग्राहकांना परवडेल अशा किमतीत 4G मोबाईल आणला आहे. JioBharat B1 असं या मोबाईलचे नाव असून हा स्मार्टफोन अवघ्या 1,299 रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. JioBharat B1 हा 4G मोबाईल कंपनीने नवीन डिझाईन मध्ये उपलब्ध केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Jio Bharat B1 या मोबाईल मध्ये 2.4 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 2000 MAH बॅटरी देण्यात आली असून एकदा चार्ज केला तरी याचे चार्जिंग जास्त काळ टिकते. खास गोष्ट म्हणजे या या मोबाईल च्या माध्यमातून तुम्ही UPI पेमेंट देखील करू शकता . यामध्ये QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. कंपनीने या फोनमध्ये 23 भाषा उपलब्ध केले आहेत. म्हणजेच 23 भाषांमध्ये हा फोन तुम्ही वापरू शकतात.

कॅमेरा– Jio Bharat B1

Jio Bharat B1 या स्मार्टफोनमध्ये पाठीमागे कॅमेरा मॉडेलमध्ये सिंगल कॅमेरा उपलब्ध आहे. त्यानुसार युजर फोटो काढू शकतात. त्याचबरोबर या फोनमध्ये  स्मार्टफोनप्रमाणे जिओ सिनेमा, जिओ सावन आणि fm रेडिओ देखील उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल मॅट आणि ग्लॉसी एलिमेंट्सच्या माध्यमातून डेव्हलप केला आहे.

किंमत किती?

Jio Bharat B1 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 1,299 रुपये ठेवली आहे. त्यानुसार तुम्ही हा मोबाईल दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Jioच्या ऑफलाइन स्टोअर किंवा अमेझॉनच्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता. कंपनीने हा फोन सिंगल ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे.