Jio Bharat Phone आता अमेझॉनवर उपलब्ध; फक्त 999 रुपये लागतील मोजावे

टाइम्स मराठी | 2G मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिओ रिलायन्स कंपनीने नुकताच जिओ भारत 4G मोबाईल लाँच केला. हा सर्वसामान्यांना परवडणारा जिओ 4G स्मार्टफोन असून याची किंमत 999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स जिओ सिंगल ब्रँड आणि थर्ड पार्टी मल्टी ब्रँड डिटेल स्टोअर्स वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता कंपनीने अमेझॉन इंडिया सोबत नवीन सेलिंग पार्टनर म्हणून जोडले आहे. यानुसार आता तुम्ही अमेझॉनवरून देखील हा फोन खरेदी करू शकतात.

   

याबाबत अमेझॉन इंडियन नुकताच नवीन टीझर पोस्ट करून माहिती दिली. त्याचबरोबर अमेझॉन इंडियाने लवकरच Jio Bharat Phone फोर जी स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध होणार असल्याचा सांगितलं. 28 ऑगस्ट पासून ही विक्री सुरू करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन हजार रुपयांपेक्षा देखील कमी किमतीत उपलब्ध असून वेगवेगळ्या ऑफर्स यामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही 999 रुपयांपेक्षा देखील कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकतात.

जिओ भारत फिचर्स– (Jio Bharat Phone)

जिओ भारत या फोनमध्ये क्रिस्टल क्लियर व्हॉइससह हाय डेफिनेशन व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये मूवी व्हिडिओज स्पोर्ट्स हायलाईट्स यासोबतच जिओ सिनेमा हे फिचर यात उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये 8 करोड पेक्षा जास्त गाणे जिओ सावन प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये ऑनलाइन पेमेंट साठी यूपीआय सुविधा देखील उपलब्ध आहे.

जिओ भारत या मोबाईल मध्ये (Jio Bharat Phone) फोनमधील प्रायमरी कॅमेरा हा 13 मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा 5 mp देण्यात आलेला असून याद्वारे तुम्ही फोटो काढून स्टोरेज करून ठेवू शकतात. जिओ भारत मोबाईल मध्ये 1.77 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर या मोबाईल मध्ये 1000mAh बॅटरी उपलब्ध आहे. त्याचबरोबर एक्स्टर्नल एसडी कार्ड सपोर्ट उपलब्ध आहे. परंतु या मोबाईल मध्ये व्हाट्सअप फिचर उपलब्ध नसून तुम्ही या मोबाईल मध्ये व्हाट्सअप सुरू करू शकत नाही.

जिओ भारत मोबाईल किंमत

जिओ भारत या मोबाईल ची किंमत भारतात 999 एवढी असून हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बुकिंगची गरज नसून तुम्ही हा फोन डायरेक्ट रिटेल स्टोअर वर जाऊन घेऊ शकतात. त्याचबरोबर या मोबाईल मध्ये तुम्हाला Ash Blue आणि Solo Black या कलर वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा मोबाईल खरेदी करताना तुम्हाला यासोबत चार्जर देण्यात येईल.

जिओ भारतच्या मोबाईल सोबत तुम्हाला 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. 123 रुपयांचा हा प्लॅन 28 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 14 GB डेटा आणि सर्व जिओ एप्स उपलब्ध आहे. यासोबतच तुम्ही 1234 रुपयांमध्ये वर्षभरासाठी रिचार्ज प्लॅन घेऊ शकतात.