Jio चा मोठा धमाका!! फक्त 999 रुपयांत लाँच केला 4G Mobile; मिळतायंत जबरदस्त फीचर्स

टाइम्स मराठी । Jio रिलायन्स कंपनीने त्यांच्या युजर साठी धमाकेदार गिफ्ट आणलं आहे. कंपनीने भारतीय बाजारामध्ये स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त देश बनवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने 999 रुपयांच्या किमतीमध्ये Jio Bharat v2 नावाचा 4G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला आहे. ज्यामुळे आतापर्यंत 2G फोन वापरणारे ग्राहक आता 1000 रुपयांमध्ये 4G इंटरनेट असलेला फोन वापरू शकतील. त्याचबरोबर कंपनीने या मोबाईल सोबतच 2 प्लॅन देखील लॉन्च केले आहे.

   

रिलायन्स कंपनीने भारतीय हँडसेट मेकर कार्बन या कंपनीसोबत पार्टनरशिप केली असून जिओ भारत हा बेसिक फीचर असलेला फोन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये 4G इंटरनेट सुविधा देखील देण्यात आलेली आहे. यासोबतच ग्राहकांना जिओ प्लॅन देखील घ्यावा लागणार आहे. त्याची किंमत मंथली 123 रुपये एवढी असेल. जर तुम्ही Annual plan घेऊ इच्छित असाल तर हा प्लॅन 1234 रुपयांना मिळेल. त्यामध्ये 16 GB डाटा प्लॅन देण्यात येणार असून दररोज 0.5 GB डेटा मिळू शकेल.

काय काय फीचर्स मिळतील –

जिओ रिलायन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 250 मिलियन 2G फोन यूजर आहेत. पण त्यांच्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध नसून ते फिचर फोन वापरतात. पण आता जिओ रिलायन्स ने आणलेला हा फोन इंटरनेट सुविधेसह उपलब्ध असून यामध्ये HD व्हॉइस कॉलिंग, FM रेडिओ आणि 128 GB मेमरी कार्ड यासारखे फीचर्स आहे. त्याचबरोबर 71 ग्राम वजनाच्या या फोन मध्ये 1.77 इंच TFT स्क्रीन, 0.3MP कॅमेरा, 1000 mAh बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, पॉवरफुल लाऊड स्पीकर आणि टॉर्च हे उपलब्ध आहे.

जिओ भारत v2 हा मोबाईल 22 भारतीय भाषेत काम करतो. या फोनमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमा सबस्क्रीप्शन सोबत जिओ सावन चे 8 करोड गाण्यांचा एक्सेस देखील देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जिओ पे हा ऑप्शन यामध्ये आहे. म्हणजेच युजर्स जिओ पे या ऑप्शन सह UPI वरून ऑनलाइन पेमेंट सुद्धा करू शकतात. रिलायन्स जिओ कंपनी 7 जुलै च्या पूर्वी 1 मिलीयन जिओ भारत फोनचं बीटा टेस्टिंग करणार आहे.