Jio Recharge : जिओ कंपनीचा छोटू पॅक 75 रुपयात, स्वस्तात मस्त

Jio Recharge : जिओ रिलायन्स कंपनी सतत आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे प्लान आणत असते. जेणेकरून या प्लानचा वापर युजर्स करू शकतील. असाच एक प्लॅन आता लॉन्च करण्यात आलेला आहे. हा प्लॅन म्हणजेच छोटा पॅकेट बडा धमाका असणार आहे. जिओ कंपनीने लॉन्च केलेले हे प्लॅन सर्वात स्वस्त, कमी किंमतीत आहे. यात डेटा पॅक सह अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस देखील देण्यात आले आहे. जर तुम्ही जिओ फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरु शकतो. या प्लॅनची किंमत 75 रुपयांपासून 91, 125, 152, 186 रुपयांपर्यंत आहे.

   

75 रुपयांचा जिओ प्लॅन

जिओ रिलायन्स कंपनीने जिओफोन ग्राहकांसाठी 75 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 23 दिवसांपर्यंत असून दररोज 0.1MB इंटरनेट आणि 200MB अतिरिक्त डेटा या प्लॅन मध्ये दिल्या जाणार आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएस फ्री देण्यात येणार आहे.

जिओ चा 91 रुपये वाला Jio Recharge

जिओ रिलायन्स कंपनीने जिओफोन ग्राहकांसाठी 91 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 0.1MB डाटा मिळू शकतो.याचबरोबर 200MB अतिरिक्त डाटा देखील मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 फ्री एसएमएस सेवा देखील देण्यात येणार आहे.

जिओ 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ रिलायन्स कंपनीने त्यांचा युजरसाठी हा खास प्लॅन आणलेला आहे. या प्लॅन नुसार जिओ फोन धारकांना 125 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 0.5mb डाटा, 300 फ्री एसएमएस देण्यात येणार आहे.

152 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

जिओ रिलायन्स कंपनीने जिओ फोन युजर्ससाठी 152 रुपयांचा प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असून अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 0.5MB डाटा, 300 फ्री एसएमएस या प्लॅनमध्ये देण्यात येणार आहे. Jio Recharge

जिओ 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ फोन युजर्स साठी 186 रुपयांचा प्लॅन जिओ कंपनीने लॉन्च केलेला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज एक जीबी डेटा देण्यात येणार असून 28 दिवसांपर्यंत याची मुदत आहे.