Jio Recharge Plan : वर्ल्ड कपच्या निमित्ताने Jio ने लाँच केले 6 नवीन रिचार्ज प्लॅन; मिळणार हे फायदे

टाइम्स मराठी | प्रसिध्द टेलिकॉम कंपनी Jio जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स (Jio Recharge Plan) उपलब्ध करत असते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा करून देण्याकडे Jio चा सातत्याने कल असतो. भारतात Jio आणि Airtel मध्ये टक्कर पाहायला मिळते. सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची रणधुमाळी सुरू असून यानिमित्ताने Jio ने आपल्या ग्राहकांसाठी 6 नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. Jio च्या या 6 रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही फ्री मध्ये मॅच पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या सर्व प्लॅन्स बद्दल….

   

किती रुपयांचे आहेत रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plan

यामध्ये सर्वात पहिला आणि बेसिक प्लान 328 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरा प्लॅन 388 मध्ये उपलब्ध असून तिसऱ्या प्लानची किंमत 758 आहे. Jio च्या चौथ्या रिचार्ज प्लॅन ची किंमत 808, पाचव्या प्लॅनची किंमत 598, आणि सहाव्या प्लॅनची किंमत 3178  रुपये एवढी आहे.

Jio चा 328 आणि 388 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

Jio रिलायन्स कंपनीने लॉन्च केलेल्या रिचार्ज प्लान पैकी पहिल्या 328 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला 1.5 GB डेटा मिळतो. यासोबतच तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचे 3 महिन्यांसाठी सबस्क्रीप्शन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही या रिचार्ज प्लान च्या माध्यमातून क्रिकेट मॅच बघू शकतात. Jio च्या 388 रुपयांचा रिचार्ज प्लान ची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी  हॉटस्टार सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. या रिचार्ज प्लान च्या माध्यमातून दररोज 2 GB डाटा मिळू शकतो.

Jio चा 758 आणि 808 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

जिओच्या 758 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला 1.5 जीबी डेटा दररोज मिळू शकतो. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलेडीटी 84 दिवसांपर्यंत आहे. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या रिचार्ज प्लॅन मध्ये आणखीन एक प्लॅन उपलब्ध आहे.  जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर तुम्ही 808 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकतात.  या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला 2GB डेटा मिळू शकतो. हा रिचार्ज प्लान 84 दिवसांसाठी वैध असणार आहे. त्याचबरोबर या रिचार्ज प्लॅन सोबतच डिज्नी प्लस हॉटस्टार चे 3 महिन्यांसाठी सबस्क्रीप्शन देखील मिळेल.

Jio चा 598 आणि 3178 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

जर तुम्ही पूर्णपणे एक वर्षांसाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन घेऊ इच्छित असाल तर Jio आणखीन दोन प्लॅन तुम्हाला  फायदेशीर ठरतील. त्यानुसार तुम्ही 598 चा रिचार्ज करू शकतात. या रिचार्ज मध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. 598 रुपयांचा रिचार्ज मध्ये तुम्हाला 2 जीबी डेली डाटा लिमिट मिळेल. त्याचबरोबर जिओचा 3178 रुपयांचा रिचार्ज प्लॅनचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकतात. या रिचार्ज प्लान नुसार तुम्हाला 365 दिवसांपर्यंत दररोज 2 GB डेटा मिळेल. एवढेच नाही तर या रिचार्ज प्लॅनमध्ये (Jio Recharge Plan) तुम्हाला एका वर्षासाठी हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मिळेल.