Jio Recharge Plan : सणासुदीच्या काळात Jio चे ग्राहकांना गिफ्ट; लाँच केला नवा रिचार्ज प्लॅन

टाइम्स मराठी । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी रिलायन्स जिओ ही कंपनी ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे रिचार्ज  प्लॅन (Jio Recharge Plan) आणत असते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदे मिळावे यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील असते. सध्या भारतात सणासुदीचा काळ असून या दिवस ग्राहकांना खुश करण्यासाठी पुन्हा एकदा जिओने नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा सह OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन आणि फ्री एक्सेस देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.चला तर जाणून घेऊया Jio च्या नव्या रिचार्ज प्लॅन बद्दल संपूर्ण माहिती….

   

Jio चा 3227 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- (Jio Recharge Plan)

रिलायन्स जिओने घोषित केलेल्या नवीन प्लॅनची किंमत ही 3227 रुपये आहे. हा प्लॅन पूर्ण एक वर्षासाठी वैध असणार आहे.  या प्रीपेड रिचार्ज प्लॅन मध्ये अनलिमिटेड डेटा सह फ्री मेसेजिंग देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर OTT प्लॅटफॉर्म चे फ्री एक्सेस देखील या प्लॅन सोबत उपलब्ध करण्यात येईल. म्हणजेच या प्लान च्या माध्यमातून मूवी स्पोर्ट्स आणि बाकी टीव्ही शो पाहणे सुद्धा सोईस्कर होईल.

तुम्हाला या रिचार्ज या प्लॅनमध्ये  दररोज 2 GB हाय स्पीड डेटा देण्यात येईल.  म्हणजेच या प्लॅनच्या माध्यमातून 730 जीबी डेटा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येईल. यासोबतच प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100 फ्री SMS सुविधा देखील देण्यात येत आहे.  यासोबतच ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ ने Jio Cloud, Jio TV,  Jio Cinema यांचे फ्री एक्सेस मिळतील. यासोबतच कंपनीने प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशनचे सबस्क्रीप्शन देखील उपलब्ध केले आहे.

यानंतर जिओ रिलायन्सचा दुसरा प्रीपेड प्लॅन हा 3178 रुपयांचा आहे. हा प्लॅन देखील (Jio Recharge Plan) एक वर्षासाठी व्हॅलिड आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय स्पीड डेटा तुम्हाला वापरता येईल. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध  आहे. 3178 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची सर्वात स्पेशल ऑफर म्हणजे यामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल एडिशनचे सबस्क्रीप्शन देण्यात येणार आहे. या सोबतच Jio Cloud, Jio TV,  Jio Cinema चे देखील सबस्क्रीप्शन ग्राहकांना मिळेल.