JioBook 2023 अवघ्या 16,499 रुपयांत लाँच; पहा संपूर्ण फीचर्स

JioBook 2023 : Reliance Jio ने आपला बहुप्रतीक्षित लॅपटॉप JioBook 2023 आज लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप 16,499 रुपयांच्या अगदी स्वस्त किमतीत बाजारात आणला आहे. येत्या 5 ऑगस्ट पासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वरून तसेच रिलायंस डिजिटलच्या ऑनलाईन स्टोअर वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू शकता. Jio आपल्या या स्वस्तात मस्त लॅपटॉपवर 1 वर्षाची मॅनुफॅक्चरिंग वॉरंटी सुद्धा देत आहे. चला तर आज आपण Jio च्या या ४G लॅपटॉपचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

11.6-इंचाची स्क्रिन –

JioBook 2023 ला 11.6-इंच अँटी-ग्लेअर HD स्क्रीन देण्यात आली आहे. हा लॅपटॉप वजनाने सुद्धा अगदी हलका आहे, त्यामुळे कुठेही घेऊन जाताना आपल्याला त्रास होणार नाही. या लॅपटॉपचे वजन फक्त 990 ग्रॅम आहे. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या लॅपटॉपच्या तुलनेत हे वजन खूपच कमी आहे. या नवीन JioBook मध्ये कंपनीने Mediatek MT 8788 octa core प्रोसेसर दिला आहे. Jio च्या या लॅपटॉप मध्ये 4 GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. हे स्टोरेज तुम्ही 256GB पर्यंत वाढवू शकता.

फीचर्स – JioBook 2023

JioBook मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, HDMI पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि सिम सपोर्ट यांसारखे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या लॅपटॉप मध्ये ड्युअल बँड वाय-फाय, 75+ कीबोर्ड शॉर्टकट, ट्रॅकपॅड जेश्चर, वायरलेस प्रिंटिंग फीचर यांसारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. एकदा हा लॅपटॉप फुल्ल चार्ज केला कि सलग ८ तास न थांबता चालतोय. त्यामुळे तुम्ही सलग 8 तास यावरून काम करू शकता. Jio च्या या लॅपटॉपमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसाठी सिम कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. परंतु हा लॅपटॉप फक्त जिओ सिमला सपोर्ट करतो. जिओ ने आपला नवा JioBook 2023 अवघ्या 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडेल यात काही शंकाच नाही.