टाइम्स मराठी | (JioBook 2023) परदेशात बनवलेले लॅपटॉप आणि कंप्यूटर, टॅबलेट यासारख्या उपकरणाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे. भारत सरकारने मेक इन इंडिया ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असून यामुळे परदेशी कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मोठा फायदा होऊ शकतो. कारण काही दिवसांपूर्वी जिओ बुक हा लॅपटॉप लॉन्च करण्यात आला असून विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या लॅपटॉपची खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
सरकारने नवीन नियम लागू केल्यामुळे आता बाहेरच्या देशांमधून लॅपटॉप आणि कंप्यूटर सारखे उपकरणांची आयात होणार नाही. यामुळे भारतामध्ये तयार होणाऱ्या लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या निर्मिती आणि असेंबलींगला चालना मिळू शकते. त्याचबरोबर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ ने 31 जुलैला नवीन जनरेशन चा लॅपटॉप लॉन्च केला. सरकारने घेतलेला हा निर्णय आणि सरकारच्या धोरणामुळे रिलायन्सच्या या नवीन जनरेशन लॅपटॉप ला मोठ्या प्रमाणात पसंती मिळून विक्री होऊ शकते. रिलायन्स जिओ कंपनीचा हा दुसरा लॅपटॉप असून JioBook 2023 हा लॅपटॉप या कंपनीने अवघ्या 16,499 अशा परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे.
तस पाहिलं तर मेक इन इंडिया मध्ये फक्त रिलायन्स चे नाव नसून बऱ्याच भारतीय कंपन्यांचा देखील यात समावेश आहे. परंतू किमतीचा विचार केला तर इतर कंपन्यांच्या मानाने रिलायन्सचा लॅपटॉप हा परवडणारा ठरत आहे. याचबरोबर भारत सरकारने परदेशी लॅपटॉप बंदीचा निर्णय पण अशा वेळी घेतलाय जेव्हा रिलायन्स जिओने नुकताच नवीन जिओ बुक लॉन्च केला. त्यामुळे जिओ बुकची विक्री आणखीनच वाढू शकते. बाकीच्या ब्रँडचे लॅपटॉप हे महाग असल्यामुळे ग्राहकांना परवडणारे नसून स्वस्तात मस्त असा लॅपटॉप घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे नक्कीच जिओ बुकची चांगली होणार असल्याचे दिसून येत आहे.
काय आहेत जिओ बुक लॅपटॉप फिचर -JioBook 2023
Jiobook 2023 लॅपटॉप 4G कनेक्टिव्ह आणि ऍक्टाकोर प्रोसेसर सह उपलब्ध असून कंपनीने स्वतः विकसित केलेल्या Jio OS या ऑपरेशन सिस्टीम वर चालतो. जिओ बुक लॅपटॉप बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला असून त्याचं वजन 990 ग्राम एवढं आहे. या लॅपटॉप मध्ये 11.6 इंच एचडी अँटिग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या लॅपटॉपमध्ये 8 कोर मीडिया टेक MT8788 प्रोसेसर देण्यात आला असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह उपलब्ध आहे. या जिओ लॅपटॉप मध्ये इन्फिनिटी कीबोर्ड, jioOS सॉफ्टवेअर देण्यात आले असून हे अँड्रॉइड वर बेस्ड आहे. हा जिओ बुक लॅपटॉप तुम्ही फक्त 16,499 मध्ये खरेदी करू शकता.