JioBook 2023 : उद्या लाँच होणार Jio चा नवा लॅपटॉप; Mobile पेक्षाही स्वस्त किंमत?

JioBook 2023 । देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स जिओ आता मोबाईल नंतर हळूहळू लॅपटॉप मार्केटमध्येही आपले पाय पसरत आहे. त्याचाच भाग म्हणजे रिलायन्स जिओ उद्या आपल्या यूजर्ससाठी 4G लॅपटॉपच्या रूपात JioBook लाँच करणार आहे.प्रसिद्ध इ-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर या लॅपटॉपची विक्री उद्यापासून होणार आहे . अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर यासाठी ‘नोटिफाय मी’ बटणही दिलं आहे. आज आपण या लॅपटॉपचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

फीचर्स – JioBook 2023

Jio चा नवीन लॅपटॉप तुम्हाला 4G कनेक्टिव्हिटी तसेच वायफाय सपोर्ट देईल. यामध्ये गेमिंग आणि मनोरंजनासाठी ऑक्टा-कोर चिपसेट वापरण्यात आले आहे. या लॅपटॉपचे वजन 990 ग्रॅम असेल. JioBook हा लॅपटॉप JioOS या ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. जिओची ही स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. युजर्सला यामध्ये काही प्री-लोड केलेले अॅप्स देखील मिळतील. जिओच्या या लॅपटॉपच्या समोर एक वेबकॅम देखील दिला जाणार आहे, ज्याचा वापर करून व्हिडिओ कॉलसाठी करता येतील. महत्वाचे म्हणजे हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर २४ तास तो चालू शकतो. म्हणजेच तुम्हाला सतत चार्जिंग करायची आवश्यकता भासणार नाही.

किंमत किती :

JioBook 2023 च्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, कंपनीने अद्याप या लॅपटॉपच्या किमतीबाबत खुलासा केला नसला तरी रिलायन्सचा हा नवीन लॅपटॉप 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत आणला जाऊ शकतो. म्हणजेच मोबाईलच्या किमतींपेक्षाही जिओ चा हा लॅपटॉप तुम्हाला स्वस्तात मिळू शकतोय. तुम्ही हा जिओ बुक निळ्या आणि ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असलेल्याना JioBook 2023 बेस्ट पर्याय ठरू शकेल.