आता गाडी चोरी होण्याचं टेन्शन मिटलं; Jio ने लाँच केलं हे डिवाइस

टाईम्स मराठी । जिओ कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च करत असते. या प्रॉडक्ट च्या माध्यमातून एखादे काम करणे सोयीस्कर आणि सोपे होते. त्यानुसार आता कंपनीने  नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. हे प्रॉडक्ट खास कारसाठी डेव्हलप करण्यात आले असून JIOMOTIVE असं या प्रॉडक्टचं नाव आहे. या डिवाइस च्या माध्यमातून तुमची नॉर्मल कार स्मार्ट कार होईल.  कारण यामुळे तुमची कार चोरीला जाण्याचा प्रश्नच मिटणार आहे. या डिवाइस मध्ये कारला अतिरिक्त सुरक्षा लेयर देण्यात आली आहे. या सुरक्षा लेयरच्या माध्यमातून हेल्पला मॉनिटर करणे सोपे होते. जाणून घेऊया काय आहे हे प्रॉडक्ट.

   

काय आहे हे डिवाइस

Jiomotive या डिवाइसच्या माध्यमातून  हेल्थ मॉनिटरिंग केली जाते. जिओ कंपनीने लॉन्च केलेले हे डिवाइस GPS प्रमाणे काम करते. या दिवाळीच्या माध्यमातून कार चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल. एवढेच नाही तर या डिव्हाईसच्या माध्यमातून रियल टाईम लोकेशन ट्रॅकिंग देखील केली जाऊ शकते. जेणेकरून तुमची कार कुठे आहे हे तुम्हाला समजेल. हे डिवाइस स्पेशल प्लग अँड प्ले प्रणालीवर काम करते. या डिवाइसच्या माध्यमातून वाहन चोरी होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

फिचर्स

JIOMOTIVE या डिवाइस मध्ये एंटी टो अलर्ट, थ्रेफ्ट अलर्ट, एक्सीडेंट डिटेक्शन, वायफाय, हॉटस्पॉट आणि टाइम फेसिंग यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच डिवाइस मध्ये हेल्थ आणि परफॉर्मन्स मॉनिटरिंग देखील उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून तुमच्या गाडीमध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला लगेच इन्फॉर्मेशन मिळू शकते. या डिवाइस मध्ये रियल टाईम व्हिकल ट्रेकिंग देखील उपलब्ध आहे. हे रियल टाइम व्हीकल ट्रेकिंग लोकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मॅप मध्ये पाहू शकतात.

जिओ फेसिंग

JIOMOTIVE या डिवाइस मध्ये देण्यात आलेले जिओ फेसिंग च्या माध्यमातून मॅप वर वर्चुअल बोन्ड्री बनवता येऊ शकते. या जिओ फेसिंग च्या माध्यमातून तुम्ही  तुमच्या गाडीसाठी एक बाउंड्री निश्चित करू शकतात. या बाउंड्रीच्या बाहेर तुमचे वाहन गेल्यास  तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. एवढेच नाही तर स्पीड, अग्रेसिव्ह ब्रेकिंग यासारखे पॅरामीटर्स देखील या डिवाइसच्या माध्यमातून मॉनिटर करता येतात.

किंमत किती?

JIOMOTIVE या डिवाइस मध्ये  सिम सपोर्ट उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे जिओ सिम या डिवाइस च्या माध्यमातून एक्सेस करू शकतात. त्यासाठी तुम्हाला दुसरे सिमकार्ड घेण्याची गरज नाही. या डिवाइसची किंमत 4999 रुपये एवढी आहे. तुम्ही देखील हे डिवाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  रिलायन्स डिजिटल, ऑफिशियल वेबसाईट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म, Amazon इंडिया वरून खरेदी करू शकता.