टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी रिलायन्स Jio कंपनीने Jio Bharat हा मोबाईल लॉन्च केला होता. आता Jio ने इंडियन मोबाईल काँग्रेस IMC या इव्हेंट मध्ये नवीन 4G फोन लॉन्च केला आहे. JioPhone Prima 4G असे या मोबाईलचे नाव असून तुम्हाला या मोबाईल मध्ये Youtube आणि Whatsapp यासारख्या बऱ्याच ॲप्सचा सपोर्ट देखील मिळतोय. या मोबाईल मध्ये तब्बल 23 भाषांचा वापर करता येतोय. आज आपण Jio च्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्यांच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
स्पेसिफिकेशन
JioPhone Prima 4G हा फोन KaiOS वर काम करतो. ही ऑपरेटिंग सिस्टीम खास करून स्मार्ट फीचर फोनसाठी डिझाईन करण्यात आली आहे. हे Firefox ऑपरेटिंग सिस्टीम ओपन सोर्स प्रोजेक्ट वर बेस्ड आहे. या मोबाईल मध्ये ARM Cortex A53 प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला 2.4 इंच TFT डिस्प्ले मिळत असून हा डिस्प्ले 320×240 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. कंपनीने JioPhone Prima 4G ला 1800 mAh लॉंग लास्टिंग बॅटरी दिली आहे.
कॅमेरा– JioPhone Prima 4G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईल मध्ये फ्रंट आणि रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यानुसार समोरील बाजूला 0.3 MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. मोबाईलच्या पाठीमागील बाजूला सर्क्युल बोल्ड आणि प्रीमियम डिझाईन देण्यात आली आहे. ही डिझाईन 1.55 सेंटीमीटर मध्ये डेव्हलप करण्यात आली असून या सर्कल मध्ये Jio चा लोगो वापरण्यात आला आहे. या JioPhone Prima 4G मध्ये 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे.
फिचर्स
या फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3 सपोर्ट देण्यात आला आहे. या सोबतच वायर मायक्रोफोन 3.5 mm, FM रेडिओ यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच 23 लैंग्वेज सपोर्ट, Whatsapp , Facebook , Youtube , JioTV , Jio Cinema , Jio News हे अँप्स देखील या फोनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच या फोनमध्ये तुम्ही या एप्लीकेशन चा वापर करू शकतात. एवढेच नाही तर हा फोन गुगल मॅप्स सह 1200 पेक्षा जास्त ॲप्सला सपोर्ट करतो.
किंमत
JioPhone Prima 4G च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर रिलायन्स जिओने हा मोबाईल 2,599 रुपयात लॉन्च केला आहे. तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जिओ मार्टच्या अधिकारीक साइटवरून खरेदी करू शकता. कंपनीने हा मोबाईल निळ्या आणि पिवळ्या रंगात उपलब्ध केला आहे. एवढेच नाही तर जिओ ने लॉन्चिंग ऑफर देखील ग्राहकांसाठी दिली आहे. या लॉन्चिंग ऑफरनुसार या मोबाईलच्या खरेदीवर कॅशबॅक डील, बँक ऑफर आणि कुपन यांचा समावेश होतो.