गे असल्यामुळे शाळेत असताना….; करण जोहरने सांगितला ‘तो’ किस्सा

टाइम्स मराठी । बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख असलेला करण जोहर (Karan Johar) च्या चित्रपटांना 90 च्या दशकांमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. नव्वदच्या दशकामध्ये करण जोहरने दिग्दर्शित केलेले कौटुंबिक चित्रपट हे प्रत्येकाच्या मनाला भाळत होते. परंतु गे असल्यामुळे करण जोहरला शाळेत असताना बऱ्याच संघर्षांचा सामना करावा लागला. शाळेत असताना प्रचंड चेष्टा होत असल्यामुळे करण अनेक वर्ष नैराश्यमध्ये होता. पहिल्यांदा करण जोहरने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून याबाबत वक्तव्य केलं. यासोबतच शालेय जीवनातील अनुभव देखील शेअर केले.

   

“बी अ मॅन यार” या शो मध्ये एका मुलाखतीमध्ये करण जोहरने वैयक्तिक आयुष्य बाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर करण जोहर आणि शाहरुख खान याची प्रचंड मैत्री आहे. शाहरुख खान बद्दल बोलताना करण ने किस्सा देखील शेअर केला. त्यावेळी करण जोहर ने सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खानने कधीच मला कमीपणाची किंवा अपमानास्पद वागणूक दिली नाही. शाहरुख खानने नेहमीच मला पाठिंबा दिला.

त्याचबरोबर करण जोहर ने शाळेतील किस्सा देखील सांगितला. यावेळी करण जोहर म्हणाले की, दहावी मध्ये असताना मी एका मुलीवर प्रेम असल्याचे नाटक केले होते. त्या मुलीचं नाव शलाका होतं. त्यावेळी शाळेत मला पॅन्सी म्हणून चिडवले जायचं. या शब्दामुळे बरेच वर्ष मी नैराश्यात होतो आणि मानसिक त्रास देखील होत होता असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिग्दर्शक म्हणून करण जोहरला इंडस्ट्रीमध्ये आता 25 वर्षे पूर्ण झाली आहे. 1995 पासून करण जोहर हे नाव प्रचंड गाजत असून यापूर्वी देखील करण जोहरने हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. नुकताच करण जोहरचा रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.