Kawasaki च्या या बाईकवर मिळतोय 60,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट; पहा कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । 2023 या वर्षातला डिसेंबर हा शेवटचा महिना आहे. अशातच Kawasaki India कंपनीने काही बाईक्स वर 31 डिसेंबर पर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे. म्हणजे नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी तुम्ही कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. Kawasaki कंपनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट बाईक लॉन्च करत असते. या बाईक्स ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडतात. तुम्ही देखील Kawasaki ची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु आर्थिक बजेट जुळत नसेल तरीही तुम्ही हे वर्ष संपण्यापूर्वी डिस्काउंट ऑफर नुसार बाईक खरेदी करू शकता. जाणून घेऊया काय आहे ऑफर.

   

Kawasaki Vulcan S Discount Offer

KAWASAKI Vulcan S या मिडीलवेट क्रुझरवर कंपनीकडून 60,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. सध्या तरी मार्केट मध्ये या बाईकची किंमत 5.94 लाख रुपये आहे. या डिस्काउंट ऑफर नुसार तुम्ही कमी किमतीमध्ये ही बाईक खरेदी करू शकतात. ही बाईक 650cc लिक्विड कुल्ड पॅरेलल ट्विन इंजिन सह येते. हे इंजिन 7500 RPM वर 61 PS पावर आणि 6600 RPM वर 63 nm पिक टॉर्क जनरेट करते.

Kawasaki Ninja 650 Discount Offer

Kawasaki Ninja 650 या बाईकवर कंपनीकडून 30,000 रुपयांची सूट मिळत आहे. ही बाईक मार्केटमध्ये 7.16 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे. या बाईक मध्ये 649 Cc इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 68 ps पावर आणि 64 nm पिक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. यासोबतच एडवेंचर टूरर वर कंपनी 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

या कंपन्या देखील देत आहे डिस्काउंट ऑफर

2024 हे कॅलेंडर वर्ष सुरू होण्यापूर्वी उपलब्ध असलेला स्टॉक विक्री करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. Kawasaki सोबतच Harley Davidson, Triumph, यासारख्या बऱ्याच प्रीमियम बाईक्स निर्माता कंपन्या त्यांच्या उपलब्ध असलेल्या स्टॉकवर डिस्काउंट ऑफर देत आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिप वरून ऑफर तपासू शकता. Kawasaki ची डिस्काउंट ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंत मर्यादित आहे.