Kawasaki लवकरच घेऊन येतेय 2 Electric Bike; पहा रेंज आणि फीचर्स

टाइम्स मराठी । बाईक निर्माता कंपनी Kawasaki लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन Electric Bike लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईकचं नाव Ninja e-1 आणि Z e-1 असं आहे. कावासाकीने यापूर्वी ninja 400 आणि Z400 हे दोन मॉडेल लॉन्च केले होते. त्यानंतर आता लवकरच आणखीन दोन मॉडेल कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. सर्वात आधी या दोन्ही बाईक युरोप आणि UK मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

   

मोटर

Ninja e-1 आणि Z e-1 या दोन्ही बाइक मध्ये एयर कूल्ड, इंटेरियर परमानेंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 9 kw पेक्षा जास्त पावर प्रदान करते. तसेच ही मोटर 6 kw पावर आणि 29nm पिक टॉर्क जनरेट करते. Ninja e-1 हे मॉडेलचे टॉप स्पीड हे 62 किलोमीटर प्रति तास इतकं आहे परंतु परंतु 15 सेकंदानंतर हाच आकडा 54 किलोमीटर प्रति तासावर येतोय.

फिचर्स

Ninja e-1 आणि Z e-1 या दोन्ही बाइक मध्ये वेगवेगळे लेआउट उपलब्ध असून यामध्ये 4.3 इंच साठी TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. दोन्ही बाइकमध्ये दोन पावर मोड उपलब्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे इको आणि दुसरा रोड . याशिवाय यामध्ये वॉक मोड देखील उपलब्ध आहे. वॉक मोड मध्ये रायडर पार्किंग वेळी गाडी मागे पुढे करता येऊ शकते. जेणेकरून पार्किंग करत असताना काही अडचण येणार नाही.

बॅटरी

Ninja e-1 आणि Z e-1 या दोन्ही बाइक मध्ये दोन लिथियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 3.7 तासात पूर्णपणे चार्ज होते. आणि 1.6 तासांमध्ये 20 ते 80 टक्के चार्ज होते. या बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर 70 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकतात. एवढेच नाही तर ही बॅटरी स्वॅप देखील केली जाऊ शकते. जेणेकरून बाईकची आणखीन रेंज वाढेल. Ninja e-1 आणि Z e-1 या दोन्ही मॉडेलमध्ये स्टील ट्रेलिस चेसिस देण्यात आले आहे. यासोबतच टेलिस्कोपिक पोर्क 41mm, मोनो शॉक, 17 इंच व्हील देण्यात आले आहे. हे दोन्ही मॉडेल ICE च्या तुलनेत प्रचंड हलके असून दोन्ही बाइक चे वजन 140 kg पेक्षा कमी आहे.