Kawasaki ने लाँच केली KX85 आणि 2024 KLX300R Dirt Bike

टाइम्स मराठी । भारतामध्ये रायडर्सची कमी नाही. तरुण पिढीमध्ये रायडिंगसाठी बऱ्याच स्पेशल बाईक उपलब्ध आहेत. भारतामध्ये स्पोर्ट बाईकची मोठ्या प्रमाणात चलती असून तरुण पिढीचा कल या बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आता Kawasaki कंपनीने 2024 KLX300R आणि KX85 या दोन डर्ट बाईक लॉन्च केल्या आहे. ही बाईक ऑफ रोड कॉम्पिटिशन बाईक रेंज मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय Kawasaki या सेगमेंटची बाईक लॉन्च करणारी पहिली निर्माता कंपनी आहे.  या बाईक मध्ये स्पोर्ट डिझाईन देण्यात आली असून बरेच अपडेट आणि फीचर्स उपलब्ध आहेत.

   

Kawasaki KX85 फीचर्स

Kawasaki KX85 या डर्ट बाईक मध्ये प्लास्टिक बॉडी पार्ट्स वापरण्यात आले आहे. या बाईकमध्ये ऍडजेस्टेबल 36 MM यूएसडी फोर्क्स, ऍडजेस्टेबल KYB रियर मोनोशॉक, फ्रंट आणि रियर मध्ये  275 mm सस्पेंशन ट्रॅवल, 17 इंच फ्रंट आणि 14 इंच रियर व्हील या डर्ट बाईक मध्ये मिळतात. कंपनीने या बाईकमध्ये हेडलाईट, ब्लींकर,किंवा टेललॅम्प यासारखे  कोणत्याच प्रकारचे लाईट या बाईक मध्ये वापरलेले नाही.

Kawasaki KX85 स्पेसिफिकेशन

Kawasaki KX85 ही डर्ट बाईक ट्यूबलेस फ्रेमवर डेव्हलप करण्यात आली आहे. यामध्ये 84 cc सिंगल सिलेंडर, टू स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअर बॉक्स ने सुसज्ज आहे. या बाईक मध्ये कंपनीने एर्गो फिट साईजिंग सिस्टीम वापरली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून रायडर ला हँडलबार ॲडजस्ट करण्यासाठी आणि फिट करण्यासाठी परवानगी मिळते.

Kawasaki 2024 KLX300R  फिचर्स

Kawasaki 2024 KLX300R कावासाकी कंपनीची ही ट्रायल बाईक आहे. या बाईक चे पार्टस आणि बॉडी KX85 प्रमाणे प्लास्टिकने डेव्हलप करण्यात आली आहे. या बाईक मध्ये  कंपनीने 43 mm यूएसडी फोर्क्स, रियरला मोनोशॉक, दोन्ही साईड ने 285 mm ट्रेवल देण्यात आले आहे. यासोबतच  2024 KLX300R या बाईक मध्ये फ्रंट साईडने 21 इंच  आणि रियर मध्ये 18 इंच व्हील देण्यात आले आहे.

Kawasaki 2024 KLX300R पावरट्रेन

Kawasaki 2024 KLX300R या बाईकला पावर देण्यासाठी 292 cc 4 स्ट्रोक लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 29 BHP पावर आणि 27nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज करण्यात आले आहे. या बाईकमध्ये देखील कंपनीने एर्गो फिट साईजिंग सिस्टीम वापरली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून  रायडर्स ला  हँडलबार ऍडजेस्ट करण्यास मदत होईल.

किंमत

Kawasaki KX85  आणि Kawasaki 2024 KLX300R या लॉन्च करण्यात आलेल्या बाईक कंपनीने  शिकाऊ रायडर्स, मुलं आणि तरुणांना लक्षात घेऊन डेव्हलप केली आहे. या बाईक मध्ये वापरण्यात आलेले एलिमेंट  हे गुणवत्तापूर्वक असल्यामुळे आणि सस्पेन्शनमुळे या  दोन्ही बाईक्सच्या किमती जास्त आहेत. कंपनीने KAWASAKI KX85 या बाईकची किंमत 4.20 लाख रुपये ठेवली असून Kawasaki 2024 KLX300R ची किंमत 5.60 लाख रुपये एवढी आहे.