Kawasaki Ninja 650 अपडेटेड फीचर्ससह भारतात लॉन्च; किंमत किती?

टाइम्स मराठी (Kawasaki Ninja 650) । भारतामध्ये कावासाकीने नवीन अपडेटेड 2024 निंजा 650 ही बाईक लॉन्च केली आहे. ही नवीन अपडेटेड बाईक जुन्या मॉडेल पेक्षा जास्त महाग आहे. या बाईक ची किंमत 7.16 लाख रुपये एवढी आहे. ही स्पोर्ट बाईक नवीन OBD2 नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे. बाजारात Ninja 650 ही बाईक ट्रायंफ ट्राइडेंट 660 या बाईकला तगडी फाईट देईल.

   

काय आहेत फीचर्स – Kawasaki Ninja 650

Kawasaki Ninja 650 या बाईकच्या फिचर बद्दल बोलायचं झालं तर या बाईकमध्ये रायडोलॉजी एप्लीकेशन च्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले देण्यात आलेला असून एलईडी हेडलाईट आणि टेल लाईट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देखील उपलब्ध आहे. या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जास्त बदल करण्यात आलेले नसून पहिल्या मॉडेल प्रमाणेचे डिझाईन केलेलं आहे. यामध्ये फुली फेयर स्टाइलिंग, ट्विन पॉड एलईडी हेडलॅम्प, फ्रंट एप्रन वर एक विंडशील्ड, फ्लोटिंग टेल सेक्शन सह स्टेप अप सीट आणि अंडरबेली एक्झॉस्ट देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या बाईक मध्ये रेसिंग टीम ग्राफिक्स सह सिंगल लाईम ग्रीन पेंट स्कीमदेखील उपलब्ध आहे.

23EX650P S 44SGN1DRF3CG A

649cc इंजिन-

Kawasaki Ninja 650 या बाईक मध्ये 649cc इंजिन देण्यात आलेले असून हे लिक्विड कोल्ड, पेरेलल ट्विन इंजिन उपलब्ध आहे. या इंजिनला आता E20 नुसार अपडेट करण्यात आले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 67.3 bhp पॉवर जनरेट करते आणि 6700 rpm वर 64 nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 6 स्पीड ट्रान्समिशन सोबत जोडले गेले आहे.

Ninja 650 या बाईक मध्ये 41 mm चा टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स देण्यात आलेले असून मोनोशॉक सस्पेन्शन देखील उपलब्ध आहे. यामध्ये ड्युअल चॅनल ABS सिस्टीम सह डिस्क ब्रेक कंट्रोल उपलब्ध देण्यात आले आहे. या बाईक मध्ये 17 इंच अलोय व्हील्स,120/70 सेक्शन फ्रंट आणि 160/60 सेक्शन रियल ट्यूबलेस टायर देण्यात आले आहे.