नव्या अवतारात येणार Kawasaki ची Eliminator 450

टाइम्स मराठी । Kawasaki कंपनीच्या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरतात. तरुण पिढीला या बाईक्स मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. आता कंपनीने स्पोर्ट्स बाईक लवर्स साठी नवीन टिजर जारी केला आहे. या टिजर नुसार आता कंपनी लवकरच Eliminator 450 ही बाईक लॉन्च करणार आहे. ही बाईक गोवा मध्ये आयोजित होणाऱ्या आगामी 2023 इंडिया बाईक वीक मध्ये सादर केली जाईल. सध्या ही बाईक ग्लोबल मार्केटमध्ये दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. 

   

फिचर्स

NEW KAWASAKI ELIMINATOR 450 या बाईक मध्ये आकर्षक डिझाईन आणि स्पेशल फीचर्स बघायला मिळतील. त्यानुसार या बाईक मध्ये गोल हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, सर्क्युलर इंधन टाकी, कम रायडर सीट, रियर फेंडर  हे स्पेशल फीचर्स  देण्यात येतील. या बाईक मध्ये आरामदायक रायडिंग साठी  फूट पेग्स, आणि पूल बॅक हँडलबार देण्यात आले आहे. बाईकची सीट 734 mm उंच आहे. म्हणजेच हे बाईक कमी हाईट असलेल्या रायडरसाठी देखील कम्फर्टेबल आहे. कंपनीने ही बाईक  आरामदायक सीट, अर्गोनॉमिक ग्रॅब रेल्स, आणि रायडरच्या गरजा लक्षात घेऊन डेव्हलप केली आहे.

पावरट्रेन

NEW KAWASAKI ELIMINATOR 450 या बाईक मध्ये  पावर देण्यासाठी 451cc 2 सिलेंडर लिक्विड कुल्ड DOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 45.4 PS मॅक्झिमम पावर आणि 42.6 nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे. यासोबतच अप्रतिम रायडींग साठी असिस्ट आणि स्लीपर क्लास देखील यामध्ये जोडण्यात आले आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

NEW KAWASAKI ELIMINATOR 450 या बाईकच्या फ्रंट मध्ये 41 mm टेलिस्कोपिक फोर्क, ट्वीन रियर शॉक अब्सोर्बर  देण्यात आले आहे. यासोबतच ब्रेकिंग बद्दल बोलायचं झालं तर बाईकच्या फ्रंटला 310 mm आणि रियल ला 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. हे ब्रेक्स ABS सिस्टीमच्या माध्यमातून नियंत्रित केली जातात.

किंमत किती?

NEW KAWASAKI ELIMINATOR 450 कंपनीने ही बाईक ग्लोबल मार्केटमध्ये पर्ल रोबोटिक व्हाईट आणि पर्ल स्टॉर्म ग्रे कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत  5.7 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारात बाईक मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर Kia V302C सोबत प्रतिस्पर्धा करेल.