Kia Carens X-Line भारतात लॉन्च; या खास फीचर्सने जिंकणार ग्राहकांची मने, किंमत किती?

टाइम्स मराठी । साउथ कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली नवीन SUV Car लॉन्च केली आहे. या नवीन SUV चे नाव Kia Carens X-Line असं आहे. या लौंचिंग वेळी कंपनीने Carens X-Lineup च्या विस्ताराची घोषणा देखील केली आहे. Kia Carens X-Line ही SUV २ व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यानुसार पहिले म्हणजे म्हणजे पेट्रोल 7DCT व्हेरिएंट आणि दुसरं म्हणजे डिझेल 6AT व्हेरिएंट मध्ये ही SUV उपलब्ध करण्यात आली आहे. या SUV ची किंमत 18.95 लाख रुपये ते 19.44 लाख रुपये एवढी आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

डिझाईन

Kia Carens X-Line या SUV मध्ये 6 सीटर कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे. या एसयूव्ही मध्ये इंटरनल आणि एक्स्टर्नल दोन्ही नवीन पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. या CARENS X-Line चा एक्स्टर्नल लुक हा एक्सक्लुझिव्ह मॅट ग्रॅफाइड कलर ऑप्शन मध्ये डिझाईन करण्यात आला आहे. आणि इंटेरियर मध्ये एक्सक्लुझिव्ह टू टोन ब्लॅक आणि स्प्लेंडिड सेज ग्रीन या थीम नुसार लूक डिझाईन करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या SUV मध्ये असलेले सीट, आर्मरेस्ट, स्टिअरिंग व्हील, गियर लिवर कवर हे देखील आकर्षक डिझाईनसह करण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन– Kia Carens X-Line

Kia Carens X-Line मध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 158 BHP पावर देते तसेच या गाडीमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजन देखील उपलब्ध आहे. हे डिझेल इंजन 114 BHP पावर देते. हे इंजन 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. Kia Carens X-Line या SUV मध्ये रियर सीट एंटरटेनमेंट सिस्टीम वापरण्यात आली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून पॉडकास्ट, स्किन मिररिंग, काही एंटरटेनमेंट ॲप्स, न्यूज ऍप्स यासारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या रियल सीड्स स्किनला स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून कनेक्ट करून कंट्रोल करण्यात येते.

Kia Carens X-Line ही SUV लॉन्च करत असताना Kia इंडियाचे प्रमुख सेल आणि बिझनेस ऑफिसर म्यूँग सिक सोहन यांनी सांगितलं की, आमच्या प्रॉडक्ट ने कार प्रेमींसाठी खास ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला ब्रांड बनण्यासाठी मदत मिळाली आहे. Kia Carens X-Line ही एसयूव्ही तरुण पिढी सोबतच जुन्या जनरेशनच्या लोकांना देखील प्रचंड आवडेल. आणि या एसयूव्हीमुळे आमची लोकप्रियता आणखीन वाढेल.