Kia ने नवीन कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलच्या डिझाईन बद्दल केला खुलासा; लवकरच होणार लॉन्च

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लोकप्रिय असलेली Kia लवकरच कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीने या प्रसिद्ध MPV कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली असून नुकतच कंपनीने या मॉडेलच्या इंटेरियर डिझाईन बद्दल खुलासा केला. ही MPV लॉन्च झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेल्फायर सेगमेंट मध्ये स्थित राहील. कंपनीने या MPV मॉडेलमध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले असून या कारचा लुक आणि डिझाईन देखील अप्रतिम आहे.

   

डिझाईन –

Kia कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलचे इंटेरियर प्री फेसलिफ्ट मॉडेल प्रमाणे आहे. यामध्ये बरेच बदल करण्यात आले असून इंटरियर मध्ये एक नवीन ड्युअल टोन कलर्स स्कीम, नवीन ड्युअल स्क्रीन डिजिटल क्लस्टर, इन्फोटेनमेंट सेटअप, नवीन सेंटर कन्सोल, टच बेस्ड बटन सह गिअर उपलब्ध आहे. Kia कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल या मॉडेलच्या एक्स्टर्नल बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये डबल डिझाईन करण्यात आलेले ग्रील्स, बंपर, हेडलाइट्स, टेललाईट, नवीन टेलगेट सह नवीन फ्रंट प्रोफाइल देण्यात आली आहे. या कारमध्ये नवीन अलॉय व्हील देखील उपलब्ध आहेत.

इंजिन

Kia कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये एक नवीन हायब्रीड इंजिन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. हे 1.6 लिटर टर्बो चार्ज्ड इंजिन असेल. हे इंजिन मोटर ने सुसज्ज करण्यात येईल. कंपनी हे मॉडेल भारतात CKD कम्प्लीटली नॉक्ड डाऊन किट सह स्थानिक स्तरावर असेंबल करण्यात येईल.