Kia Cars Price Hike : KIA चा ग्राहकांना दणका!! 1 एप्रिल पासून गाड्यांच्या किमती महागणार

Kia Cars Price Hike । सध्याचा काळ हा महागाईचा काळ आहे. सर्वत्र गोष्टीच्या किमती गगनाला भिडत असून दररोज महागाईचा नवा उच्चांक गाठला जात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा महागाईचा भडका उडाला असून गाड्यांच्या किमतीत वाढ होत आहेत. कच्चा मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक वाहनाच्या किमती मागील काही महिन्यापासून वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता प्रसिद्ध ब्रँड KIA ची सुद्धा भर पडली आहे. कारण किया इंडियाच्या गाड्या 1 एप्रिल 2024 पासून महाग होणार आहेत. सध्याच्या गाड्यांच्या किमतीमध्ये ३ % नी वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

   

कोणकोणत्या गाड्यांच्या किमती वाढल्या – Kia Cars Price Hike

KIA कडून ज्या गाड्यांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत त्यामध्ये Kia Seltos, Kia Sonet आणि Kia Carens सारख्या कारचा समावेश आहे. कंपनीने या तिन्ही कारच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी प्रथमच आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने एका निवेदनात म्हंटल कि, वस्तूंच्या किमतीत वाढ पुरवठा साखळी संबंधित इनपुट या कारणामुळे गाड्यांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

किया इंडियाचे नॅशनल सेल्स आणि मार्केटिंग हेड हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, कंपनी ग्राहकांना प्रीमियम आणि तांत्रिकदृष्ट्या अपडेटेड आणि सक्षम गाड्या बनवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र वस्तूंच्या किमतीत सतत होणारी वाढ, प्रतिकूल विनिमय दर आणि वाढत्या इनपुट खर्चामुळे आम्हाला थोड्या प्रमाणात का होईना पण किमतीत वाढ (Kia Cars Price Hike) करावी लागत आहे.

दरम्यान, भारतात अगदी कमी कालावधीमध्ये KIA ने ग्राहकांची मने जिंकली आहेत. कंपनीने 5 वर्षांपेक्षा कमी वेळेत देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात एकत्रितपणे 11 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. यापैकी Kia Seltos ची सर्वाधिक विक्री झाली असून तब्बल 6.13 लाख गाड्या विकल्या गेल्या आहेत. त्यानंतर Kia Sonet चे 3,95,000 युनिट्स आणि Carens चे 1,59,000 युनिट्स विकले गेले आहेत.