Kia EV5 : 720 KM रेंज देतेय Kia ची Electric Car; किंमत किती पहा

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार आणि  टू व्हीलर उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस वाढत चालणारे पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाईमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे  ग्राहकांचा कल दिसून येतो. यामुळे बऱ्याच ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या  इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये  वाहन डेव्हलप करत आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये होंडा, बजाज, TVS यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी उडी घेतली आहे. आता KIA कंपनीने Kia EV5 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने बरेच नवीन फीचर्स उपलब्ध केले असून ही कार तब्बल 720 किलोमीटर पर्यंत रेंज देतेय. आज आपण जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

Kia EV5 या इलेक्ट्रिक कार मध्ये कंपनीने 3 ट्रीम लेवल उपलब्ध केले आहे. त्यानुसार स्टॅंडर्ड, लॉन्ग रेंज, AWD यांचा समावेश होतो. स्टॅंडर्ड ट्रिम ऑप्शन मध्ये  कंपनीने 160KW क्षमता असलेली मोटर वापरली आहे. एवढेच नाही तर यात BYD LFP ब्लड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 64.2 KWH क्षमतेची असून 530 km पर्यंत रेंज देते. या कारच्या लॉंग रेंज मॉडेल मध्ये 88 KWH बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 720 किलोमीटर पर्यंत रेंज देते. स्टॅंडर्ड ट्रिम मध्ये उपलब्ध असलेली मोटर यामध्ये उपलब्ध आहे. या कारच्या  AWD मॉडेल मध्ये फ्रंट आणि रियर साईडने मोटर देण्यात आली आहे. त्यानुसार फ्रंट साईडने 160  KW आणि रियर  साईडने 70 KW मोटर वापरण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये 88  KWH क्षमता असलेली बॅटरी  दिली आहे.

KIA EV5 या इलेक्ट्रिक कारच्या इंटिरियर मध्ये कंपनीने क्लीन डिझाईन दिली आहे. जेणेकरून कम्फर्ट लेव्हल वाढते. या इलेक्ट्रिक मॉडेल मध्ये कंपनीने 3 स्क्रीन उपलब्ध आहे. त्यानुसार यात 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 5 इंच क्लायमेट कंट्रोल, 12.3 इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले वापरण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये लेवल दोन असिस्टंट ड्रायव्हिंग सपोर्ट सह सेमी ऑटोमेटेड लेन चेंजिंग सपोर्ट, इंटेलिजंट रिमोट कंट्रोल पार्किंग फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.

Kia EV5 या मॉडेलमध्ये कंपनीने गिअर लिवर सह 4 स्पोक स्टिअरिंग व्हील्स दिले आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ADAS सिस्टीम वापरण्यात आली आहे. तसेच 7 एअर बॅग, L2 लेवल असिस्टेड ड्रायव्हिंग, रिमोट कंट्रोल स्मार्ट पार्किंग यासारखे फीचर्स दिले आहे. कंपनीने सध्या तरी ही कार चीनमध्ये उपलब्ध केली असून लवकरच जागतिक बाजारात लॉन्च होऊ शकते.

किंमत– Kia EV5

KIA EV5 या कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने ही कार 169,800 युवान म्हणजेच 19 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने ही इलेक्ट्रिक कार 149,800 युवान म्हणजे 17.61 लाख रुपयात लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक कार वर कंपनीने 5 वर्षांची वॉरंटी दिली असून ही वॉरंटी 1 लाख किलोमीटर रेंज पर्यंत लागू असेल. एवढेच नाही तर कार मध्ये उपलब्ध असलेली बॅटरी मोटर आणि इलेक्ट्रिक कंट्रोल सिस्टीम ला 8 वर्षांपर्यंत किंवा 1,50,000 किलोमीटर पर्यंत चालवली जाऊ शकते.