टाईम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खऱ्या अर्थाने परवडत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे आहे. फक्त दुचाकीच नव्हे तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्याही बाजारात आहेत. तुम्ही सुद्धा अशीच एक परवडणारी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला Kia इंडियाची इलेक्ट्रिक कार kia EV6 बाबत सांगणार आहोत. आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या या कारचे मुख्य वैशिट्ये म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल 708 किलोमीटर अंतर पार करते.
708 KM रेंज, 8 वर्षाची बॅटरी वॉरंटी-
Kia EV6 मध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर मिळते. ही मोटर 320 bhp पॉवर आणि 605 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कार मध्ये 77 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला असून एकदा ही बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर Kia EV6 708 किलोमीटर अंतर कापू शकते. त्याचबरोबर या कारच्या बॅटरीवर 8 वर्षाची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.
फीचर्स –
वेगवेगळ्या फीचर्स ने परिपूर्ण असलेलया या कार मध्ये ऍडजेस्टेबल स्टेअरिंग, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, लो फ्यूल वार्निंग, हीटर, रियर सीट हेडरेस्ट, सीट लुंबर सपोर्ट, रियर सीट सेंटर आर्म रेस्ट, पार्किंग सेंसर, इंजन स्टार्ट स्टॉप, स्टीयरिंग व्हील गियर शिफ्ट पैडल, टेलगेट अजर यांसारखी वैशिष्टये मिळतात. गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास या EV6 कारची एक्स शोरूम किंमत 60.95 ते 65.95 लाख रुपयांपर्यंत आहे. किंमत जरी जास्त वाटत असली तरी तिची वैशिष्टये सुद्धा चांगली आहेत.