टाइम्स मराठी । कोरियन कार निर्माता Kia India ने EV6 इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी मल्टिपल चार्ज पॉइंट ऑपरेटर जोडण्यासाठी आणि चार्जिंग ॲप मध्ये K charge ही नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीने चार्जिंग प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले असून 1000 चार्जिंग स्टेशन कव्हर करणार असल्याचे देखील सांगितलं. KIA EV6 ही कार कंपनीने दोन व्हेरियंटमध्ये भारतात लॉन्च केली होती. आता कंपनीने ग्राहकांसाठी K CHARGE ही सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली असून या सुविधेच्या मदतीने ग्राहक चार्जिंग स्टेशन सर्च करू शकतात.
Relax इलेक्ट्रिकसोबत केली पार्टनरशिप
KIA कंपनीने उपलब्ध केलेल्या K CHARGE सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना 1000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधता येऊ शकतात. कंपनीने हा उपक्रम सक्षम करण्यासाठी पाच चार्जिंग पॉईंट ऑपरेटर सोबत सहयोग केला आहे. ज्यामध्ये स्टॅटिक, चार्जझोन, रिलॅक्स इलेक्ट्रिक, लायन चार्ज आणि ई-फिल चार्जिंग ऑपरेटिंग यांचा समावेश होतो. किआ इंडिया कंपनीने चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून ग्राहकांना तीन महिने मोफत चार्जिंग ऑफर करण्यासाठी Relax इलेक्ट्रिकसोबत पार्टनरशिप केली आहे.
मिळतील या सुविधा
KIA च्या MYKIA या ॲपमध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या K-CHARGE सुविधेच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधता येतील. K CHARGE या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना चार्जिंग स्लॉटची उपलब्धता देखील चेक करता येईल. एवढेच नाही तर या ॲपमध्ये देण्यात आलेल्या वॉलेट सर्विसेसच्या माध्यमातून ग्राहक ॲप मधूनच पेमेंट करू शकतील.
ही आहे कंपनीची योजना
याबाबत की Kia India चे सेल्स आणि मार्केटिंगचे राष्ट्रीय प्रमुख श्री हरदीप सिंह बराड यांनी सांगितलं की, 2026 पर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे वार्षिक विक्रीचे लक्ष गाठण्याचा किआ इंडियाचा उद्देश आहे. यासोबतच 2030 पर्यंत RV बॉडी स्टाईल मध्ये स्थानिकरित्या निर्मित EV आणि जागतिक ईव्ही मॉडेल्स भारतात लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.